गडचांदूर:-@national highway...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा-आदिलाबाद 930 B, या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दिवसेंदिवस गती प्राप्त होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर राजूरा ते कोरपना मार्गावरील पुर्वीच्या अनेक लहानमोठ्या नाल्यांना नवीन स्वरुप देण्यासाठी त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात खोदकाम सुरू आहे. दोन्ही बाजूने मातीचे खोदकाम करून पोकलेन, जेसीबीच्या सहाय्याने त्यामध्ये मुरूम भरला जात आहे.असे असताना मात्र या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना न केल्याने सदर राष्ट्रीय महामार्ग जनतेच्या जिव्हारी लागल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे.
वास्तविक पाहता ज्याठिकाणी अशा प्रकारचे काम होतात त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केली जाते.मात्र येथे सूरू असलेल्या काही कामांच्या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महामार्गावर खोदलेल्या नाल्यांची मातीच्या ठिकाणी तसेच वळणावर कोणतेही "मार्ग दिशा निर्देश'' किंवा "सावधानीचे फलक" लावण्यात न आल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. मागील आठवड्यात कोरपना मार्गावरील 'आसन' नाल्याजवळ टाकण्यात आलेली गिट्टी व मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरल्याने अब्दुल कादीर या व्याक्तीचा अपघाती मृत्यू झाला.ही घटना ताजी असतानाच 9 फेब्रुवारी रोजी कोरपना येथील मुरलीधर आमने हा शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतातून दुचाकीने घरी परतत असताना नाल्याजवळ खोदून ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरून जागीच ठार झाला.मात्र याबाबत सदर कंस्ट्रक्शन कंपनीने कोणतीही सहनुभूती दाखवली नाही.!

यासर्व घटनांना सदर कंस्ट्रक्शन कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून या भागात सुरक्षेचा अभाव असल्याने अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे.एकामागून एक घडलेल्या दोनही घटनेबद्दल कंपनी विरोधात कारवाई करून त्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी करत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती झाली तर मृतकाच्या कुटुंबियांकडून कंपनी विरूद्ध पोलीस कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सै.आबीद अली यांनी दिला आहे.आता याकडे संबंधित कंस्ट्रक्शन कंपनी कंत्राटदार याला किती गांभीर्याने घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.
Increase in accidents on national highways.

----------//----------
0 टिप्पण्या