Subscribe Us

header ads

LCB ची अवैध गोवंश जनावर वाहतूक तस्करांवर कारवाई. LCB takes action against illegal cattle traffickers.

@Korpanalive news....
         चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा LCB ला 14 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवंश जनावरांची तस्करी करीत असलेल्य 3 आयशर वाहनावर कारवाई करण्यात आली.यामध्ये अवैधरीत्या नेत असलेल्या 47 गोवंश जनावरांची सुटका करून 40 लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.LCB takes action against illegal cattle traffickers.
          नागभीड हद्दीतील काम्या मार्गे 3 आयशर वाहन अवैधरीत्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी लगतच्या तेलंगणा राज्यात नेत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना मिळाली असता गुन्हे शाखेचे पो.हवा.सुरेंद्र महतो,ना.पो.कॉ.दिपक डोंगरे,गणेश मोहुर्ले,दिनेश अराडे,पोकॉ गणेश भोयर,विनोद जाधव यांचे एक पथक नेमून यांच्या मदतीला नागभीड पोलीस स्टेशनचे सपोनि कोरवते,साखरे यांना आदेशीत करण्यात आले. सदर पथकाने बामणी बस थांब्याजवळ नाकेबंदी केली.दरम्यान काम्पा मार्गे 3 आयशर वाहनाला थांबविण्यात आले.सदर वाहनांची तपासणी केली असता यामध्ये तब्बल 47 गोवंश जनावरे आढळून आले.पोलीसांनी मोहम्मद कासीम शेख वयर्ष 46 रा.शिवानगर वार्ड नगभीड,समीर अक्रम खान वयवर्ष 34 रा.जांभूळघाट ता.चिमूर,सैय्यद कोसर वयवर्ष 38 रा.मंगरूळपीर जि.वाशीम,अशोक ठोंबरे वयवर्ष 70 रा.बेलखेड ता.मंगरूळपीर, मोहम्मद मोहसीन वयवर्ष 32 रा.आसेगांव ता. मंगरूळपीर जि.वाशीम या 5 आरोपींना अटक करून गोवंश हत्या कायदांतर्गत गुन्हा दाखल करून अंदाजे 4 लाख,70 हजार किंमतीचे 47 गोवंश जनावरे,3 आयशर वाहन कि.अंदाजे 36 लाख,असा एकूण 40 लाख,70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात नागभीड पोलीस स्टेशनचे सपोनि कोरवते,पो.उपनि साखरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा.सुरेंद्र महतो,नापोकॉ दिपक डोंगरे,गणेश मोहुर्ले,पोकॉ गणेश भोयर, विनोद जाधव,नागभीड पोस्टे स्टॉफ यांच्या मदतीने केली असून पुढील तपास पो.स्टे.नागभीड करीत आहे.
LCB takes action against illegal cattle traffickers...
                      --------//--------
                    
                 मुख्यसंपादक
               सै.मूम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या