गडचांदूर:-@korpanalive news.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP रवींद्र परदेशी यांनी नुकतीच जिल्ह्यातील जवळपास 34 पोलीस अधिकाऱ्यांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली केली आहे.त्यामध्ये पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश कोंडावार यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखा LCB ची कमान सोपवण्यात आली आहे.महेश कोंडावार हे यापूर्वी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे होते.यानंतर ते पडोली पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून रूजू झाले.या काळात त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना आता थेट गुन्हे अन्वेषण विभाग LCB ची जबाबदारी देण्यात आली असावी अशी कौतुकास्पद चर्चा सध्या गडचांदूर शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.
एलसीबीसाठी काही पोलीस निरीक्षक इच्छुक होते.त्यामध्ये शहर पोलीस ठाण्याचे विद्यमान एसएचओ सुधाकर अंभोरे यांचा नाव प्रमुख होता.असे असताना मात्र अंभोरे यांनी काही वर्षांपूर्वी एलसीबीची कमान हाती घेतली होती आणि ते काही महिन्यात निवृत्त होणार असल्याचे कळते.बहुतेक त्यांची LCB मधूनच निवृत्तीची इच्छा असावी पण त्यांची बदली ब्रम्हपुरी ठाण्यात झाली आहे.दुसरीकडे गेल्या कही दिवसांपासून LCB ची कमान महेश कोंडावार यांच्याकडे सोपवली जाऊ शकते अशी चर्चा अधूनमधून ऐकायला मिळत होती शेवटी त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
Mahesh Kondawar is now in charge of LCB...
-------//------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

0 टिप्पण्या