Subscribe Us

header ads

त्या...चोरट्यांना LCB कडून मुद्देमालासह अटक. Tya...Choratyanna LCB kadun muddemalasah atak.

चंद्रपूर:-@Crime story...
     चंद्रपूर शहरातील घुटकाला परिसरात गेल्या 7 महिन्यापूर्वी एका बंद घरात शिरून चोरट्यांनी घराच्या कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले होते.पोलिस तपासात सदर गुन्हा निष्पन्न न झाल्याने आरोपींना अटक झालेली नव्हती. अशातच जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश देत स्थानिक गुन्हे शाखा LCB ला जबाबदारी दिली असता LCB ने तपास सुरू केला.
      दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी काही संशयित सोन्याचे दागिने विकण्याच्या उद्देशाने येथील सराफा लाईन मध्ये आल्याची गुप्त माहिती LCB ला मिळाली.माहितीच्या आधारे LCB ने सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 39.830 ग्रॅम सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा एकूण 1 लाख 82 हजार 297 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मुजाहिद उर्फ मुज्जू आहत शेख वयवर्ष 23 व शहबाज उर्फ गोलू सादीक शेख वयवर्ष 2,दोन्ही रा.जलनगर यांना ताब्यात घेऊन दोघांची कसून चौकशी केली असता 7 महिन्यांपूर्वी घुटकाला येथील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबूली दिली.हे दागिने त्याच घरफोडीतील असल्याचे त्याने सांगितले आहे.त्या घरफोडीतील त्यांचा तिसरा साथीदार तनविर फरार असून तनविरकडे उर्वरित सोन्याचे दागिने असल्याची कबुली यांनी दिली आहे.सदर आरोपी मधील एकावर अल्पवयीन असताना घरफोडी,चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे कळते.जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार,नईम खान पठाण, प्रांजल झिलपे,नरेश डाहूले,प्रमोद डंभारे यांनी सदरची यशस्वी कारवाई केली आहे.
Crime story...
Tya...Choratyanna LCB kadun muddemalasah atak...
                 ---------//--------
                   
               मुख्यसंपादक
               सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या