
News@MPSC...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2023 पासून करण्याऐवजी 2025 पासून करावी,असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.परंतू एमपीएसी MPSC ने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात निर्णयबद्दल अजूनही स्पष्टपणे काहीही जाहीर केले नाही.2 दिवसांपूर्वी आयोगाने कृषी,वन,अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने 2023 पासून होतील असे जाहीर केले असल्याने सर्व उमेदवार संभ्रमात आहे.एमपीएससीने संबंधीत प्रसिद्धी पत्रक काढून हा संभ्रम दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आयोगाला द्याव्यात,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.MPSC should clear the confusion in implementing the new syllabus.यासंदर्भात अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद उपसभापती यांना पत्र पाठवून अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भातील संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.या पत्रात लोंढे पुढ म्हणतात की,MPSC ने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग 1 आणि वर्ग 2 साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे.आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे 2023 मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे.या निर्णयाची अंमलबजावणी 2023 पासून न करता 2025 पासून करण्यात यावी अशी काँग्रेस पक्षातर्फे आयोगास विनंती करण्यात आली होती.राज्यासेवा परीक्षेची तयारी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी 4 ते 5 वर्षापासून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार करत आहे.
या निर्णयामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल.नव्या बदलाला आत्मसात करून त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळणार नाही.बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे 3,4 वर्षापासून बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे.महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम UPSC च्या अभ्यासक्रमाशी सुसंगत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे.वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित आयोगाने विचारात घेतले आहे असे दिसत नाही.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21जुलै 2023 रोजी वर्णनात्मक परीक्षेचा इंग्रजीमधील अभ्यासक्रम जाहीर केला.त्यानंतर 3 महिन्यांनी 17 ऑक्टोबर 2022 मराठी मध्ये अभ्यासक्रम जाहीर केला.महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 4 जून 2023 रोजी आयोजित केली आहे.तांत्रिक सेवा ज्यामध्ये वनसेवा,स्थापत्य अभियांत्रिकी,यांत्रिकी कृषी सेवा या परीक्षांच्या मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रम जानेवारी अखेरीस जाहीर केला.परीक्षा तोंडावर आल्या असताना आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे.आयोगाने विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेतल्या पाहिजेत.विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पद्धतीमधील बदल 2025 पासून लागू करावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती.यासंदर्भात 2 आंदोलने देखील करण्यात आली आहे.सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत आमची मागणी मान्य केली व त्याची घोषणा देखील केली.परंतू यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने आयोगाला नेमके काय पत्र दिले ? हे स्पष्ट नाही.म्हणून ‘'राज्यसेवा परिक्षे संदर्भात 2025 पासूनचा जो निर्णय जाहीर केला त्याचे प्रसिद्धीपत्रक आयोगाने त्वरित जाहीर करावे" असे त्यांना सुचना देण्याची गरज आहे.
MPSC should clear the confusion in implementing the new syllabus...
--------//-------
MPSC should clear the confusion in implementing the new syllabus...
--------//-------
0 टिप्पण्या