चंद्रपूर:-@Hansraj Ahir..
चंद्रपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात एकामागून एक अनपेक्षित धक्के बसत असून गेल्या काही दिवसात चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मारहाण असो की,प्रसुती दरम्यान पुर्ण विकसीत 9 महिन्यांचा गर्भ आणि मातेचा झालेला मृत्यु असो,यामुळे चंद्रपूरचे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.असे असताना भावाच्या मृत्युनंतर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ 'डॉ.विश्वास झाडे' यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या धाकटे बंधुचा मृत्यु झाल्याचे आरोप करत चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.अहिर यांच्या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. Serious accusation of Hansraj Ahir..
सदर प्रकरणी सविस्तर असे की,हंसराज अहिर यांचे धाकटे बंधु 'हितेंद्र अहिर' यांना गेल्या 12 जानेवारी 2023 रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना चंद्रपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ 'डॉ.विश्वास झाडे' यांच्या रुग्णालयात नेले असता अवघ्या 10 मिनिटातच त्यांची प्राणज्योत मालवली.या घटनेला जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला असून 9 फेब्रवारी रोजी हंसराज अहिर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन 'आपल्या भावाच्या मृत्यूला डॉ.विश्वास झाडे यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे आरोप करत सदर घटनेची सखोल चौकशी करून डॉ.झाडे यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.
तक्रारीची दखल घेत वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ.झाडे यांच्या रुग्णालयात जाऊन चौकशीला सुरूवात केली असून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केल्याचे कळते.सदर प्रकरणाला वैद्यकीय तसेच राजकीय बाजू असल्याने पुर्ण चौकशी झाल्यानंतर गुन्ह्याची नोंद होणार असल्याचे सुद्धा कळते.हंसराज अहिर यांचे धाकटे बंधू हितेंद्र अहिर यांच्या मृत्यूला डॉ. झाडे कारणीभूत आहे की,या आरोपामागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे,याचे खरे चित्र पोलीस तपासानंतरच समोर येईल.प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ?
My brother died.Because of the looseness of the Dr.Jhade..?
Serious accusation of Hansraj Ahir..
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

0 टिप्पण्या