Subscribe Us

header ads

आता घराणेशाहीच्या जोरावर पक्ष ताब्यात ठेवता येणार नाही. Now the party cannot be controlled by the power of dynasticism.

चंद्रपूरः-@Korpanalive News...
      'शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण' निवडणूक चिन्ह,यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रीय निवडणुक आयोगाने दिला असून सत्याचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाही,असा हा स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिला आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.Now the party cannot be controlled by the power of dynasticism.
   सुधीर मुनगंटीवार म्हणाले,पक्षांतर्गत लोकशाही बळकट करणारा हा निर्णय भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा आहे.काही राजकीय पक्षांवर असलेली काही कुटुंबांची पकड ढिली करणारा आहे.या निर्णयामुळे भारतीय राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाला सुरूवात झाली आहे,असे म्हटले तर वावगे होणार नाही,असेही मुनगंटीवार म्हणाले.
Now the party cannot be controlled by the power of dynasticism...
                   ---------//-------
                   
                 मुख्यसंपादक
               सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या