Subscribe Us

header ads

हे देवा इथे,अंत्यसंस्कारालाही जागा मिळेना.Oh my god, there is no room for cremation here.

गडचांदूर:-@korpanalivenews.
    जन्माला आलो म्हणजे एक न एक दिवस मरण अटळ ? असे असताना जीवंतपणी अनेक संकटांना तोंड देत एक दिवस मरण आले आणि मयत जाळण्यासाठी जागाच मिळत नसेल तर दुर्दैवच म्हणावे लागेल.पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडायला नको,पण चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रकरण समोर आले ज्यामध्ये एका मयतीला जाळण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.
कोरपना तालुक्यातील नवेगाव-कोराडी येथील मालन शांताराम मून नामक महिलेचे 30 जानेवारी रोजी निधन झाले.जेव्हा अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर नेण्यात आले तेव्हा लगतच्या गोरे नामक शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांनी मयत जाळण्यासाठी विरोध केला. प्रकरणाची माहिती मिळताच मंडल अधिकारी,पटवारी,कोतवाल यांनी सदर ठिकाणी पोहचून शेतकऱ्याला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र तो समजण्याच्या मनस्थितीत नव्हता.गडचांदूर पोलीस स्टेशनचे जवळपास 10 ते 12 पोलीस घटनास्थळी दाखल झाले.शेवटी कसेबसे त्याने शेताच्या एका कोपऱ्यात मयत जाळण्याची परवानगी दिली आणि महिलेवर उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. बऱ्याच तासांच्या घडामोडीनंतर अत्यसंस्कार झाल्याने मृतदेहाची अवहेलना झाल्याची खंत व्यक्त होत आहे.Disrespect for the dead body.
प्राप्त माहितीनुसार सदर शेत जमीन गायराण असून सरकारी आहे आणि लगतच्या शेतकऱ्याने या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कळते.यापुर्वी देखील याठिकाणी मयत जाळण्यासाठी सदर शेतकऱ्याने विरोध केल्याची माहिती आहे.असे असताना स्मशानभूमीचा प्रश्न आजपर्यंत सुटला नसल्याने प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा नवेगाव वासीयांच्या वतीने आंदोलना movement उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी नवेगावच्या सरपंचासह सिद्धार्थ काटकर,अमोल निरंजने,बबन पेंदोर, भीमराव नगराळे,अर्चित निरंजने, कपिल नगराळे,सुरज मून,दुर्गा आकेवार,विजय काटकर इतर ग्रामवासीयांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
             "सदर शेत जमीन सरकारी" 
सदर शेत जमीन गायरण पट्टा असून सरकारी आहे.कोरपनाचे तत्कालीन तहसीलदार गाडे यांच्या कार्यकाळात येथील 40 आर(1एकर)जागा स्मशानासाठी देण्यात आली होती. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी येत्या 8 फेब्रुवारी रोजी जागेचे मोजमाप करून देण्यात येईल अशी माहिती गडचांदूरचे मंडल अधिकारी चव्हाण यांनी दिली आहे.
Oh my god, there is no room for cremation here....
            --------//--------
   मुख्य संपादकसै.मूम्ताज़                                        अली.
         मो.9049358699,9595630811.
 
                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या