Subscribe Us

header ads

गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची बदली. Transfer of Chief Officer of Gadchandur Municipal Council.

गडचांदूर:-@korpanalivenews..
    कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांची अखेर भद्रावती येथे बदली झाली आहे.3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमूक्त करण्यात आले असून पदस्थापना दिलेल्या पदावर 6 फेब्रुवारी रोजी रूजू होवून,तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा,असे आदेश संबंधित विभाग अधिकाऱ्याने एका पत्राद्वारे दिले आहे.मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांच्या बदलीची माहिती मिळताच कित्येक नागरिक आणि विशेषतः नगरपरिषदेच्या काही सत्ताधारी नगरसेवकांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याचे चित्र आहे. एकदाची बदली झाली "देवच पावला म्हणावं" शासनाने परत यांना प्रभारी म्हणून येथे पाठवू नये,अशी उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.
   
          मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी ह्या मागील अंदाजे 4 ते 5 वर्षांपासून याठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या.दरम्यानचे काही वर्ष वगळता,मागील 3 वर्षापासून यांनी कमालीची शांततायुक्त दहशत निर्माण केली होती.सत्ताधारी असो की विरोधी,प्रतिष्ठीत नागरिक असो की व्यापारी, डॉक्टर,पत्रकार आसो,यांनी सर्वांसाठी यांनी एकच धोरण अवलंबिले होते.आपल्या बेताल व मुजोरीच्या वागणूकीने नेहमी अपमानित केले.हे तर काहीच नाही, यांचा दरारा ऐवढा होता,काही सत्ताधारी नगरसेवक सुद्धा यांच्यापुढे बोलायला घाबरायचे.यांच्या वागणूकीमुळे एका विरोधी नगरसेवकाने तर यांचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नसल्याचे म्हटले होते. अशी परिस्थिती याठिकाणी होती.यांच्याकडे कोरपना, जिवती,गोंडपिपरी नगरपरिषदेचा अतिरिक्त प्रभार होता.या काळात विवीध प्रकरणी अनेकदा नागरिकांनी वरिष्ठांकडे यांची तक्रार केली परंतू कारवाई तर सोडाच साधी चौकशी सुद्धा झाली नाही. गडचांदूर शहराच्या विकासासाठी बोलायचं झालं तर काही अपवाद वगळता मागील अडीच ते तीन वर्षापूर्वी मंजूर कामे, उदाहरणार्थ येथील ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सौंदर्याकरण, माणिकगड चौक ते मार्केट रोड,मुसा ले-आऊट मधील मुस्लिम समाजाची इदगाह व इतर ठिकाणच्या काही रोड,नाल्यांची कामे आजतागायत पूर्णत्वास आली नाही.हे चित्र दिसत असूनही केवळ यांच्या धाकामुळे सत्ताधारी चकार शब्दही काढत नसल्याचे आरोप झाले.इतक्या मोठ्या नगरषदेला मुख्याधिकारी असून सुद्धा,ह्या नसल्या सारख्याच होत्या.? बदली झाली "देवच पावला" पण शासनाने अशा मुजोर अधिकाऱ्याची बदली न करता सरळ सेवेतूनच बडतर्फ करायला हवे होते,असे संतप्त मत नागरिक पाठोपाठ काही नगरसेवक सुद्धा व्यक्त करताना दिसून येत आहे.एकुणच यांचा येथील कार्यकाळ मोठ्याप्रमाणात वादग्रस्त राहीला आता ते भद्रवतीला जात आहे,मात्र धानोरकर खासदार,आमदार दाम्पत्य,नगराध्यक्ष व भद्रावतीकर यांची अरेरावी खपवून घेणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.याच पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित गडचांदूरसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावे अशी मागणी करत,पुन्हा शासन यांनाच प्रभारी म्हणून आमच्या बोकांडीवर बसवणार तर नाही ना ? अशी भीती काही नगरसेवक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Transfer of Chief Officer of Gadchandur Municipal Council...
Will he come again as the in-charge?  "Citizen Fear"...
                 --------//--------
मुख्यसंपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या