गडचांदूर:-@korpanalive news....
कोरपना तालुक्यातील "कुसल शरीफ़" येथे "हजरत दुल्हेशाह बाबा रहे.अलैह" यांचा 3 दिवसीय उर्स उत्सव 5 मार्च रोजी मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.3 day Urs celebration of Hazrat Dulheshah Baba concluded.दरवर्षीप्रमाणे यंदाही या उर्समध्ये एकतेचे अदभुत दर्शन घडले.सर्वधर्म समभावचे प्रतीक असलेल्या बाबांच्या दर्शनासाठी हजारो सर्वधर्मीय भक्त भाविकांनी गर्दी केली होती. निसर्गरम्य अशा वातावरणात पुरातन काळापासून येथे बाबांची मज़ार (समाधी)असून दरवर्षी याठिकाणी पारंपारीक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.एकतेचे प्रतिक A symbol of unity मानल्या जाणाऱ्या या तिर्थस्थळावर चंद्रपूर,जिल्ह्यासह नागपूर,वर्धा, यवतमाळ,नांदेड व तेलंगणा राज्यातून हजारोच्या संख्येने श्रद्धाळू मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येवून दर्शन घेतात.
याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह 5 मार्च रोजी सायंकाळी गडचांदूर येथील नुरानी कमिटीच्या वतीने संदल मिरवणूक काढण्यात आली.ढोल ताशांच्या गजर व अश्वांच्या मनमोहक नृत्याने शहरातील मुख्य मार्गाने भ्रमन करीत संदल कूसळकडे रवाना झाला.त्याठिकाणी बाबांच्या दर्ग्यावर रितीरिवाजाने पुजाअर्चना करून पुष्प चादर चढवण्यात आली.गडचांदूर वरून नेण्यात आलेली पुष्प चादर व रंगबेरंगी आकर्षक रोषणाईने सजवलेला अश्व रथ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.मोठ्यासंख्येने सर्व धर्मीय शहरावासीयांनी संदल मिरवणूकीचा मनसोक्त आनंद घेतला.

कोरपना तालुक्यातील "कुसल शरीफ़" येथे "हजरत दुल्हेशाह बाबा रहे.अलैह" यांचा 3 दिवसीय उर्स उत्सव 5 मार्च रोजी मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.3 day Urs celebration of Hazrat Dulheshah Baba concluded.दरवर्षीप्रमाणे यंदाही या उर्समध्ये एकतेचे अदभुत दर्शन घडले.सर्वधर्म समभावचे प्रतीक असलेल्या बाबांच्या दर्शनासाठी हजारो सर्वधर्मीय भक्त भाविकांनी गर्दी केली होती. निसर्गरम्य अशा वातावरणात पुरातन काळापासून येथे बाबांची मज़ार (समाधी)असून दरवर्षी याठिकाणी पारंपारीक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.एकतेचे प्रतिक A symbol of unity मानल्या जाणाऱ्या या तिर्थस्थळावर चंद्रपूर,जिल्ह्यासह नागपूर,वर्धा, यवतमाळ,नांदेड व तेलंगणा राज्यातून हजारोच्या संख्येने श्रद्धाळू मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येवून दर्शन घेतात.

दरम्यान पुर्वी शिवसेना व हल्ली उद्धव ठाकरे गटाचे (मशाल)चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सहकाऱ्यांसह गडचांदूर येथे संदल मिरवणूकीला भेट देऊन आनंद घेतला.संदल मिरवणूक दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक व गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
3 day Urs celebration of Hazrat Dulheshah Baba concluded...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
3 day Urs celebration of Hazrat Dulheshah Baba concluded...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
0 टिप्पण्या