Subscribe Us

header ads

4 दिवसांत जवळपास 48 लाख महिलांनी केला एसटी बसमधून प्रवास.48 lakh women traveled by ST bus in 4 days.

News@ST Bus...
राज्य सरकारने या अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सूट दिली आणि राज्यातील एसटी ST Bus बसांमध्ये महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली असून राज्यभरात 4 दिवसात तब्बल 48 लाख महिला प्रवाशांनी अर्ध्या तिकीट half ticket वर प्रवास केल्याची आकडेवारी पुढे आली आहे.राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस State Finance Minister Devendra Fadnavis यांनी महिलांना एसटी प्रवासात सूट देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी देखील आठडाभरात करण्यात आली.या सवलतीमुळे महिलांना प्रवासाबद्दल कमालीचा उत्साह दिसत असून एका बसस्थानकांवर महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली.राज्यभरात हेच चित्र पहायला मिळत असून साधी बस असो की,शिवशाही या गाडीत अर्धे तिकीट आकारले जात असल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या 75 वर्षावरील नागरिकांना मोफत आणि आता तिकीटावर महिलांना 50% सूट दिली जात आहे. या खर्चाची प्रतीपूर्ती राज्य शासन करीत आहे.
48 lakh women traveled by ST bus in 4 days...
               --------//--------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या