Subscribe Us

header ads

त्या,पेपरातील चुकांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण.

@korpanalive news....
         इयत्ता बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता 6 गुण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.हा पेपर 21 फेब्रुवारीला झाला होता व या पेपरमध्ये तीन चुका झाल्याचे आढळून आले होते.आता या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे  दिली आहे.ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना हे गुण मिळणार आहेत.या पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका आढळून आल्या.त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी होती.आता मंडळाने इंग्रजी पेपरमधील चुकांसाठी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एकूण 6 गुण मिळणार आहे. HSC Exam English Paper Decision.
               इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत मंडळाने अहवाल देण्यास सांगितले होते.यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्या विद्यार्थ्यांना 6 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे.मात्र असे असतानाही परीक्षादरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत.
HSC Exam English Paper Decision..
                        --------//-------
                     
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या