गडचांदूर:-@Political....
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता कोणत्याही क्षणी जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर होण्याचे संकेत मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर इतर ठिकाणांसह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात सुद्धा निवडणूका होणार असल्याने विवीध पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.इच्छुकांमध्ये जनतेप्रति कमालीचे प्रेम उफाळून आल्याचे चित्र असून पुर्वी ज्यांचा जनसंपर्क नाही,कधीच लोकांमध्ये मिसळले नही,भेटीगाठी नाही,अशांना अचानकपणे लोकांची आठवण येणे,आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.शेवटी "ये तो पब्लिक है,सब जानती है" YeTo Public hai,Sab Janati Hai यात तिळमात्र ही शंका नाही.वास्तविक पाहता अजून तारखा जाहीर झल्या नाही,निवडणूक प्रोग्राम आला नाही,आरक्षण Reservation काय निघणार याची माहिती नाही,असे असताना मात्र काही भावी उमेदवारांनी स्वतःच आपापल्या मनमर्जीने निर्वाचन क्षेत्राची निवड करून त्या भागातील नागरिकांशी भेटीगाठीला सुरूवात केली आहे.नानाप्रकारे जनहिताचे कार्यक्रम आयोजित करून नागरिकांशी जवळीक साधण्याचा जणू यांनी सपाटाच लावल्याचे दिसत आहे.ते म्हणतात ना "उतावळा नवरा,गुडघ्याला बाशिंग" Utavla Navara,Gudaghyala Bashing अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.ज्यांना लहान निवडणूका जिंकता आल्या नाही,ते आता चक्क जि.प.आणि पं.स. Zilla Parishad,Panchayat Samiti चे स्वप्न पाहत असल्याची चर्चाही सध्या ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.एकुण परिस्थिती बघता,आताच्या घडीला हे भावी उमेदवार जनतेचे कैवारी बनले आहे,जर आरक्षण अनपेक्षित निघाले तर,हेच त्या क्षेत्राकडे ढुंकूनही पाहणार नाही,हे तेवढेच खरे. भाऊ आता काय बोलायचं "नवरीचा पत्ता नाही, लग्नाची तारीख नाही,मुहुर्ताचा पत्ता नाही" तरी सुद्धा काही जण आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे.जर नवरी नटली (आरक्षण अनपेक्षित)तर हे काय करणार ? ऐवढे करूनही जर अपेक्षेप्रमाणे आरक्षण निघाले तर पक्ष तिकीट देणार का ? तिकीट दिली तर निवडून येणार का ? हे प्रश्नही उभे ठाकले आहे.नाही तर "तेलही गेले, तुपही गेले,हाती आले धुपारणे" म्हणण्याची पाळी तर येणार नाही ना ?अशी उपहासात्मक चर्चा सुरू आहे. Zilla Parishad,Panchayat ,Samiti Election...
Utavala Navara,Gudaghyala Bashing...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.
0 टिप्पण्या