Subscribe Us

header ads

बुरूड कारागिरांची व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारी...!

गडचांदूर:-@Burud workers..
           बुरूड समाज कारागिर हे बांबुपासून सूप, डाले,टोपल्या,ताटवे,चटाई अशा विवीध प्रकारे कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात आणि विक्री करून परिवाराचे पालणपोषण करतात.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना,कोठारी,तोहगाव,वलनी, बोर्डा,निंबाळा,केळझर,जुनोना,गिलबिली येथील कामगारांचा यामध्ये मोठ्याप्रमाणात समावेश असून या वस्तु बनवण्यासाठी कारागिरांना हिरव्या बांबूची गरज असते.मात्र वनविभाग सवलतीच्या दरात बांबूचा पुरवठा करण्यास सपशेल अपयशी ठरत असल्याचे आरोप करत विना अडथळा बांबू उपलब्ध करून  देण्यासाठी व अनेक समस्यांमुळे दारिद्र्याचे जीवन जगत असलेल्या बांबू कारागिरांची व्यथा विधानसभेत मांडून न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बुरुड समाज संघटना सचिव संतोष पटकोटवार यांनी आत्माराम तावाडे,मूना ठाकरे,प्रमोद देवगडे,बबलू नागदेवते, अनिल रायपूरे,बाळू सागोरे,बंडू दुर्गे,यश ठाकरे,गुड्डू कातकर इतरांच्या उपस्थितीत 28 जानेवारी 2023 रोजी आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन दिले होते.The plight of bamboo workers should be presented in the assembly and justice should be sought.
         "आ.जोरगेवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र."
संतोष पटकोटवार यांनी शिष्टमंडळाद्वारे दिलेल्या निवेदनाची आमदार जोरगेवार यांनी दखल घेतली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये "हिरवा बांबू डेपोमध्ये उपलब्ध होत नसल्याने बुरुड कारागिरांना जंगल कंपार्टमेंट मध्ये जाऊन बांबू तोडू देणे व निस्तार प्रमाणे त्याची नोंद घेऊन शुल्क आकारने,बांबू उत्पादन आणि वाहतुकीला ट्रान्झिट पासमुक्त करण्याचे बांबू धोरणात नमूद करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही बांबू उत्पादन आणि वाहतुकीला परवान्याची आवश्‍यकता आहे.वन विभागाकडून याबाबत कोणताही निर्णय न अवलंबल्याने बुरुड कारागिरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,निस्तार दराने बांबू विकत घेताना इतर शुल्क माफ करण्यात यावे" अशी मागणी करत बांबू कारागिरांची आर्थिक, सामाजिक व पारंपारिक व्यवसायिक अडचण लक्षात घेता त्यांना विना अडथळा बांबू उपलब्ध होण्यासाठी योग्य ती उपाययोजना व कार्यवाही करावी अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार केली आहे.The pain of Burud workers is at the door of the Chief Minister.
"मै झुकेगा नही" अशाप्रकारे आमदार किशोर जोरगेवार यांच्या बाबतीत म्हटले जाते.तसेच आमदार जोरगेवार हे बुरुड समाजाचे असल्याने आता बुरुड कारागिरांना हे कितपत न्याय मिळवून देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bamboo workers should be provided with unhindered access to bamboo...
The pain of Burud workers is at the door of the Chief Minister...
                ---------//--------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या