Subscribe Us

header ads

गडचांदूर सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस,राष्ट्रवादीचा झेंडा.

गडचांदूर:-@Election...
         गडचांदूर सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 16 मार्च रोजी पार पडली.लगेच त्याच दिवशी मतमोजणी झाली.रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत 13 पैकी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे 8 उमेदवार विजयी झाले 8 out of 13 candidates won.तर शेतकरी संघटना, भाजपा युतीच्या उमेदवारांना 5 जागेवर समाधान मानावं लागलं.सदर निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अरूण निमजे यांच्या मार्गदर्शन व काँग्रेसचे नेते नोगराज मंगरुळकर,विठ्ठलराव थिपे, सचिन भोयर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली.यामध्ये अनील नागपूरे,चंदन गावंडे, टिकाराम चिवाने,रंभाबाई गेडाम,जमूनाबाई मेश्राम,मारोती कोडापे,गुलाब पेंदोर,दादाजी मेश्राम विजयी झाले.
  राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्यासह शरद जोगी,बाबा गोरे,प्रवीण कोल्हे, काँग्रेसचे गटनेते विक्रम येरणे,नगरसेवक अरविंद मेश्राम,गडचांदूर काँग्रेस शहराध्यक्ष संतोष महाडोळे,उमेश राजूरकर,नानाजी आदे,बिबी ग्रामपंचायत उपसरपंच प्रा.आशिष देरकर,शैलेश लोखंडे,अनिल निवलकर,पुरुषोत्तम मेश्राम,अनील झाडे,रवींद्र चोधरी,दिलीप राऊत,दिलीप केळझरकर,सचिन क्षीसागर,मनोज चौधरी, शामराव विधाते,दिलीप परसुटकर,बाबुराव गोहणे, अतूल गोरे,मयूर एकरे,तुकाराम चिकटे,अनिल सिडाम,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
Gadachandur seva sahakari sansthevar congress,rashtravadicha jhenda...
8 out of 13 candidates won...
                        ---------//--------
                     
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या