Subscribe Us

header ads

आता आधार कार्ड विनाशुल्क अपडेट करता येणार..

News@Aadhaar Card Update...
            आधार कार्ड हे देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे ओळखपत्र असून ते दर काही वर्षांनी अपडेट Update करावे लागते.त्यासाठी काही शुल्कही द्यावे लागते.मात्र,आता यासंदर्भात सरकारने दिलासा दिला आहे.आधारकार्ड अपडेट Aadhaar Card Update करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही.युआयडीएआय uidai ने आधार अपडेट करण्याचे शुल्क रद्द केले आहे.मात्र,ही सुविधा केवळ आधारकार्ड ऑनलाईन अपडेट करणाऱ्यांसाठीच आहे.तुम्हाला आधार अपडेट साठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.मात्र, ते कार्यालयात जाऊन अपडेट करायचे झाल्यास त्यासाठी 50 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. आधार धारकांना 3 महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येणार असून आधार कार्डधारक 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 या कालावधित त्यांचे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकतात.विशेष म्हणजे आधार-पॅन कार्ड लिंक Aadhaar-PAN Card Link करणे देखील अनिवार्य असून त्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.
       आधारकार्डमध्ये ज्यांनी गेल्या 10 वर्षांपासून कोणतेही बदल केलेले नाही,त्यांनी ते अपडेट करून घेणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे.ऑनलाईन अपडेटसाठी आधार कार्ड धारक त्यांच्या आधार क्रमांक Aadhaar Number द्वारे https://myaadhaar.uidai. gov.in/ वर लॉग इन करू शकतात.यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर Registered mobile number वर ओटीपी otp पाठवला जातो.यानंतर स्वयंसेवा डॉक्यूमेंट अपडेटवर क्लिक करून माहिती अपडेट करता येणार आहे.आधार कार्ड ऑफलाईन पद्धतीने अपडेट करायचे असेल तर त्यासाठी आधार सेंटरवर जाऊन ठराविक शुल्क भरून ते अपडेट करता येणार आहे.
Now Aadhaar card can be updated free of charge...
                           --------//-------
                         
                   मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
    मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या