Subscribe Us

header ads

बच्चू कडूंना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.!

@korpanalivenews...
        नाशिकच्या महापालिका आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी माजी मंत्री व आमदार 'बच्चू कडू' यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.या निकाला विरोधात वरच्या न्यायालयात जाऊ तसेच,नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे,अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. Former Minister Bachchu Kadu gets 2 year Jail.
   न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतले असून त्यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.येथे जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे.दिव्यांग कल्याण निधी welfare of the disabled खर्च केला नाही,या वादातून आमदार बच्चू कडूंनी महापालिका आयुक्त यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच शिवीगाळ केली होती.यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते.सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.कडू यांना भादंविचे कलम 353 अन्वये 2 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.2017 मध्ये नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते.महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.बच्चू कडू हे 3 वेळा अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहे.3 वर्षांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाले होते.गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली व शिंदे गटात दाखल झाले आहे.Former Minister Bachchu Kadu gets 2 year Jail...
                         --------//-------
                     
                 मुख्यसंपादक
               सै.मूम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या