Subscribe Us

header ads

गडचांदूर पोलिसांची अवैध गोवंश जनावर वाहतूक तस्करांवर कारवाई.

गडचांदूर:-@Gadchandur police.
    गडचांदूर पोलिसांना 3 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या गोवंश जनावरांची तस्करी करणार्‍या एका आयशर टेंम्पो तसेच या वाहनापुढे पायलेटिंग करणारी एका ब्रेजा कारवर कारवाई केली आहे.गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अंदाजे 2 च्या सुमारास गडचांदूर जवळील थुट्रा बसस्थानक येथे नाकाबंदी करून लखमापूर मार्गे होली फॅमिली कॉन्व्हेंट समोरून थुट्राकडे येत असलेल्या एका आयशर वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 9 गायी,12 बैल,असे एकुण 21जनावरे आढळून आली.Gadchandur police takes action against illegal cattle traffickers.
          पोलिसांनी आयशर टेम्पो क्रं.MH 27 BX 5838,ब्रेजा कार क्रं.MH 49 AS 0767 असा एकूण 17 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सुभाष जाधव,वसीम खान,अब्दुल आसिफ,मोबीन शेख सर्व राहणार गडचांदूर यांना अटक केली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,उपविभागिय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सपोनी प्रमोद शिंदे,सपोनी हितेन्द्र रायपूर,पीएसआय सुनील बोरीकर,एएसआय प्रकाश इखारे,तिरुपती माने, संदीप थेरे,धिरज गोवर्धन,व्यंक्टेश भटलाडे,पोसै सौरव बोंडे यांनी केली आहे.बातमी लिहिस्तोवर पोलिस सदर आरोपींना न्यालयात हजर करण्यासाठी नेत होते.
Gadchandur police action against  of illegal cattle transport...
                    --------//-------
                 
                मुख्यसंपादक
             सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या