गडचांदूर:-@Korpanalive News....
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत मागील 5 वर्षापासून मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी तर 4 वर्षापासून सिव्हिल इंजिनिअर अनुप भगत हे कार्यरत आहे.दरम्यान मुख्याधिकारी मागील 8 ते 10 महिने वैद्यकीय रजेवर राहून परत याठिकाणी रूजू झाल्यानंतर लगेच त्यांची बदली भद्रावती येथे झाली.शासनाने याठिकाणी नवीन मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने बदली नंतरही सध्या येथील पदभार यांच्याकडेच आहे. असे असताना मागील दोन,अडीच वर्षापासून मंजूरी प्राप्त दलित वस्ती प्रभाग क्रमांक 2,या विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या प्रभागातील कामांचा श्रीगणेशा अद्यापही झालेला नाही.एकीकडे शासन दलित वस्ती उत्थानासाठी करोडोंचा निधी देत आहे तर दुसरीकडे याठिकाणी निधी आहे,कामे मंजूर आहे, परंतु गेल्या दोन,अडीच वर्षाचा कालावधी लोटूनही कामांना सुरूवात काही झालेली नाही.! ही परिस्थिती पाहुन यांनी कर्त्यव्यात कसूर केल्याचा आरोप करत दलित प्रभागतील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवणार्या न.प. अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी नगरसेवक डोहे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
जानेवारी 2020 मध्ये गडचांदूर नगरपरिषदेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडली.16 मार्च रोजी दुसरी सर्वसाधारण सभा झाली तेव्हा 14 वित्त आयोग 2019 ची निधी शिल्लक होती. त्यामधून शहरातील तब्बल 7 ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण Beautification of openspace करण्याचा ठराव पारित झाला.सत्ताधाऱ्यांनी लगेच वणी व आंध्रप्रदेशातील सिध्दीपेठचा पाहणी दौरा आयोजित केला.म्हणे,सिध्दीपेठच्या धर्तीवर गडचांदूर शहरातील ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण करणार ! सोशल मीडिया,विवीध वर्तमान पत्रात यासंदर्भात बातम्या प्रकाशित करून उहापोह करण्यात आला.मात्र सध्याची परिस्थिती पाहता "हेच का,सिध्दीपेठच्या धर्तीवर गडचांदूरातील ओपनस्पेसचे सौंदर्यीकरण !"असे प्रश्न पडल्या शिवाय राहणार नाही.2020 मध्ये 7 कामांची मंजूरी घेवून कार्यादेश देण्यात आले.परंतू दलित प्रभागातील ओपनस्पेस सौंदर्यीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही आणि बाकी कामे सुध्दा अपूर्ण आहे.झालेली कामे निकृष्ट दर्जाची असून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालून पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे आरोप नगरसेवक डोहे यांनी केला आहे.Allegation of corporator Arvind Dohe.
नियमानुसार मुदतीत काम होणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास ठेकेदाराकडून दंड वसूल करण्याची तरतूद आहे.मात्र नियम धाब्यावर बसवून न.प.चा आथिर्क नुकसान करत मनमर्जीने कामे केल्याचा आरोप नगरसेवक डोहे यांनी केला आहे.अभियंता अनुप भगत यांचे कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा उल्लेख करत,जेव्हा 7 ओपनस्पेसचा 3 कोटीहून अधिकचा निधी त्यांच्याकडे न सोपविता आपले निकटवर्तीय मेकॅनिकल अभियंता स्वप्नील पिदूरकर यांच्याकडे सोपविला गेला.सिव्हीलची कामे मेकॅनिकल करणार ! हे समजल्यावर नगरसेवक डोहे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन विरोध दर्शविला मात्र ते ऐकायला तयारच नव्हते,अखेर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सिव्हिलच्या कामांची देखरेख सिव्हिल इंजिनीअर कडूनच करण्याची मागणी नगरसेवक डोहे यांनी करताच अभियंता भगत यांना Back date मागील तारखेचे पत्र देण्यात आले.परंतु भगत यावर असमाधानी असल्याने ते कामाकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.परिणामी प्रभाग क्रं.2,दलित प्रभागातील स.नं.104 मधील काम अजूनही सुरू करण्यात आली नाही. सभागृहाने एका वर्षापूर्वीचा निधी,त्याच प्रभागात स.नं.106,110,112 मधील ओपनस्पेसमध्ये सौंदर्यीकरण करण्याचा ठराव घेण्यात आला, अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही.मात्र ठेकेदार आपल्या मर्जीने कमी मटेरियलचा वापर करून निकृष्ट कामे करीत असल्याचा आरोप नगरसेवक डोहींनी केला आहे.दिलेल्या मुदतीत कामे केली नसताना यांनी पत्र व्यवहार केले नाही, त्याचा परवाना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत नाही,दंड ही वसूल करत नसल्यामुळे न.प.चा मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाला,याला संपूर्णपणे मुख्याधिकारी आणि अभियंता जबाबदार असल्याचे आरोप करत यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री व संबंधितांकडे पत्राद्वारे केली आहे.आता या संदर्भात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Suspend the NP officials who are depriving the citizens of Dalit ward from development..
Councilor Arvind Dohe..
---------//--------
Councilor Arvind Dohe..
---------//--------
0 टिप्पण्या