Subscribe Us

header ads

फसवणूक प्रकरणी "अनील चांदेकर" अटकेत..!

कोरपना:-@Fraud..
         चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी cdcc बँक शाखा कोरपना व जिवती येथून कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून कोरपना तालुक्यातील पिपरी येथील  "नटवरलाल" अनील चांदेकर याने फसवणूक केल्याची तक्रार बोरगाव येथील एका महिलेने कोरपना पोलीस ठाण्यात दाखल केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी अनील चांदेकर याला अटक केली व 420 चा गुन्हा दाखल करून कोरपना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसाचा PCR सुनावला आहे.अनील चांदेकर याने यापुर्वी ही अनेकांना फसवल्याची चर्चा असून ते सर्व फ्रॉड Fraud आता या निमित्ताने उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.That "Natwarlal" was arrested by the police.
          अनील चांदेकर याने या भागातील लोकांना बँकेत नोकरी लावून देतो,माझे बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांसोबत अगदी जवळचे संबंध असल्याचे सांगुन,तुम्हाला पाहिजे तेवढे कर्ज मिळवून देतो,तसेच गृहकर्ज मिळवून देतो. विशेषत: आदिवासी कुटुंबांना कर्जाची गरज ओळखून याने अनेक जणांची फसवणूक केल्याचे कळते.तालुक्यातील मरकागोंदी,कारगाव,बोरगाव कोरपना,मांडवा,पारडी वनसडी सहकारी संस्थेत कर्जमाफी व रूपांतर कर्जामध्ये अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा सध्या ठिकठिकाणी एकायला मिळत आहे.अनीलने गीता कोटनाके नामक महिलेला 3 लाखांचे कर्ज मिळवून देतो म्हणून 50 हजार रूपये घेतले.मी बँक मॅनेजर असल्याचे सांगून तीला बँक शाखेत घेऊन गेला. नंतर तुमचे कर्ज जिल्हा मुख्यालयातून मंजूर होऊन तुमच्या खात्यावर 3 लाख जमा होईल. याचा ओटीपी otp मोबाईलवर आल्यानंतर तुम्ही ती रक्कम उचलू शकता.असे सांगून चंद्रपूर येथील एका व्यक्तीकडे घेऊन गेला.यासर्व घडामोडी नंतर त्या महिलेला याच्या कारभारावर संशय आला. तीने चंद्रपूर मुख्यालयासह कोरपना,जिवती शाखेत जाऊन चौकशी केली असता बँकेत कर्ज मंजूर तर सोडाच कर्जाचे प्रकरण सुद्धा नसल्याचे तीला सांगण्यात आले.यासर्व बाबीवर विचार करून आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.तीने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत दलालांचा सुळसुळाट असल्याने अनेकांची फसवणूक होत असल्याची चर्चा असून बँक कर्मचार्‍यांची जवळीक दाखवून दिशाभूल केली जात असल्याचे आरोप होत आहे.याच पार्श्वभूमीवर या नटवरलालने आजपर्यंत कुणाकुणाला फसवले याचा उलगडा पोलीसांच्या चौकशी नंतरच होण्यची शक्यता वर्तवली जात असून आता याप्रकरणी पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
That "Natwarlal" was arrested by the police..
                    ---------//---------
                    
                मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या