Subscribe Us

header ads

अतिक्रमण धारक पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित.

गडचांदूर:-@Prime Minister Yojana...
    कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर,येथील प्रभाग क्रमांक 7,8 येथे जवळपास 52 कुटुंब शासकीय जागेवर कच्चे घर बांधून राहत आहे. मोलमजूरी करून जगत असलेल्या या अतिक्रमण धारक Encroachment holder कुटुंब वहिवाट कर भरत असताना यांच्याकडे कोणतेही दस्तावेज नाही.यामुळे यांना पंतप्रधान आवास योजना व शासनाच्या इतर योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याची वेळ आली असून नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणा,...कारभारामुळे अजूनपर्यंत यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळू शकला नाही,असा खळबळजनक आरोप गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सतीश उपलेंचवार यांनी केला आहे.13 मार्च रोजी येथील अतिक्रमण धारक कुटुंबांनी सतीश उपलेंचवार आणि नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेला निवेदन देऊन सदर अतिक्रमित जागा नियमानुकुल According to the rules करून देण्यासाठी मागणी केली आहे. A statement was given under the leadership of Gadchandur BJP city president Satish Upalenchwar and corporator Arvind Dohe.
        सदर प्रभागातील 34 अतिक्रमण धारकांच्या जागेची मोजणी करण्यात आली परंतू गेल्या 3 वर्षांपासून उपविभागीय अधिकारी SDO यांच्यकडे अहवाल गेला नसल्याची माहिती असून त्यामुळे यांना अजूनही जागेचे पट्टे Strips of space मिळाले नाही.याच पार्श्वभूमीवर अजून 52 लोकांचे अतिक्रमण त्याठिकाणी अस्तित्वात आहे. मागील अंदाजे 40,50 वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहे.आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने मोलमजुरी करून कसेतरी ते पोट भरतात.परंतू त्यांना निवारा अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही.यामगचे कारण म्हणजे,अजूनपर्यंत त्यांना पट्टा मिळाला नाही,त्यांच्याकडे आपल्या घराचे कुठलेही दस्तावेजdocument नसल्यामुळे ते पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी,जे लोक अशापद्धतीने वास्तव्यास आहे,आणि त्यांचे जे अतिक्रमण आहे,ते नियमानुकुल करून त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येईल,असा जी.आर.GR केंद्रातून काढलेला आहे.त्यानुसार या 52 अतिक्रमण धारकांच्या जागेची मोजणी करून SDO कडे प्रस्ताव पाठवावा,जेणेकरून यांना जागेचा पट्टा आणि मालकी हक्क मिळेल, त्यानंतरच पंतप्रधान आवास योजनेचा लाभ यांना मिळेल,अशी मागणी थेट 52 अतिक्रमण धारकांचे नाव असलेल्या यादी सह दिलेलेल्या निवेदन statement द्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना अतिक्रमण धारक महिला,पुरूषांची उपस्थिती होती.आता नगरपरिषद यांच्या निवेदनाला किती गांभीर्याने Seriously घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Encroachment holders deprived of benefits of Prime Minister Yojana...
                       ---------//--------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या