Subscribe Us

header ads

कसबा,चिंचवड पोटनिवडणूक निकाल..?

@korpanalive news...
            राज्यातील वादळी सत्तांतरानंतर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लढली गेलेली कसबा आणि चिंचवड Kasba and Chinchwad पोटनिवडणूक ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले होते.आलेला निकाल हा भाजपच्या दृष्टीने धक्का देणारा तर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसब्यात मतदारांनी भाजपला धडा शिकवला तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे भाजपची लाज राखली गेली व भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या.बंडखोरी झाली नसती तर कदाचित येथेही भाजपला पराभवाचा धक्का बसला असता,असे राजकीय जाणकारांना वाटते.Kasba, Chinchwad by-election results..?
        कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.मात्र,मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने मविआला शह देण्याचा प्रयत्न माहणून ओबीसी OBC कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला.मात्र तो भाजपच्या अंगलट आला.तर दुसरीकडे मविआच्या वतीने काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देऊन पहिली लढाई जिंकली.कसबा मतदारसंघात धंगेकरांची लोकप्रियता भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली.तर दुसरीकडे भाजपचा पारंपरिक ब्राह्मण मतदार मतदानाच्या दिवशी उदासीन भूमिका बाळगून होता असे बोलले जात आहे.त्यामुळे मोठी ताकद लावूनही भाजपला मतदारांची नाराजी दूर करता आली नाही.स्वतः गिरीश बापट यांना भाजपने प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. मात्र,त्यातूनही चुकीचा संदेश गेल्याचे दिसत आहे. मतदारांना गृहित धरून निर्णय थोपविण्याचे काय परिणाम होऊ शकतात,याचा मोठा धडा कसब्याच्या निकालाने भाजपला दिलाय.एकीचे बळ किती महत्वाचे आहे,याचा पुनर्प्रत्यय या निकालाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणून दिला.तिकडे चिंचवडमधील विजयाने भाजपची लाज राखली गेली असली तरी हा निकाल भाजपच्या चिंता वाढवणारा आणि महाविकास आघाडीच्या आशा वाढवणारा ठरला आहे.या मतदारसंघात राहूल कलाटे यांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसते. अन्यथा येथील भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असता,असे चित्र मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.Opinion of political experts after Kasba, Chinchwad by-election results..?
          "कोणासाठी धोक्याची घंटा ?"
नागपूर पदवीधर,नागपूर शिक्षक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघानंतर आता कसब्यातील पराभव भाजपच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरतो आहे.सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजी आहे की काय,याची चाचपणी व त्यावर उपाय करणे भाजपसाठी आता अपरिहार्य झाले आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडी अधिक भक्कम होईल,अशी भविष्यवाणी काही राजकीय जाणकार करताना दिसत आहे.आता पुढे कोणते चित्र समोर येते ? हा येणारा काळच ठरवेल.
Kasba,Chinchwad by-election results..?
                      ----------//---------
                       
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या