Subscribe Us

header ads

माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत...!

@Korpanalive News....
         विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत MP Sanjay Raut हे अडचणीत आले आहे.त्यांच्यावर हक्कभंगाची टांगती तलवार असताना राऊत यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला आहे.राऊत म्हणाले,माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन.मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतो. मी चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत.सर्वोच्च सभागृहाचा मी सदस्य आहे.विधिमंडळ असो की संसद या दोन्ही सभागृहाचा मी आदर केला आहे. राज्यसभेच्या कामकाजात सर्वाधिक काळ सहभागी होणारा मी सदस्य आहे.संसदीय लोकशाहीवर मी कायम विश्वास ठेवला आहे. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी काय म्हणालो आणि कोणत्या संदर्भात म्हणालो,हे समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई होत असेल तर ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेला धरून नाही,असेही राऊत म्हणाले.
          मी आयुष्यात कधीही घाबरलो नाही.न घाबरता तुरूंगवास भोगला.महागाई,बेरोजगारी, खोक्याचे राजकारण,शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न, यावरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांना लक्ष्य केले.माझी पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आहे. असंही राऊतांनी यावेळी सांगितले.
MP Sanjay Raut on Privilege Motion...
                        --------//--------
                     
                  मुख्यसंपादक
               सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या