Subscribe Us

header ads

नगराध्यक्षाच्या वॉर्डात दारू दुकानची मागणी..!

 गडचांदूर:-@Liquor shop..
          गडचांदूर शहर हे कोरपना तालुक्यातील नावाजलेले,औद्योगिक शहर असून येथील लोकसंख्या 45 हजाराच्या जवळपास आहे. शहरात 5 देशी दारूच्या दुकाने असताना दर 4,5 महिन्याने याठिकाणी इतर शहरातील स्थलांतरित दारू दुकान लावण्यासाठी नगरपरिषदकडे ना-हरकत noc ची मागणी केली जात आहे. सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील विषय सुद्धा ठेवला जात आहे.वास्तविक पाहता दारूच्या दुकानाला विरोधाचा सामना करावा लागतो,मात्र गडचांदूर शहरात एका व्यक्तीने चक्क नगराध्यक्षांच्या वॉर्डातच दारू दुकान आणण्याची अजब,गजब Strange, amazing मागणी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.Demand for liquor shop in Mayor's ward.
                  यासंदर्भात सविस्तर असे की,प्रदीप लचय्याजी गुडेल्लीवार हे गडचांदूर शिवसेना माजी शहराध्यक्ष असून प्रभाग क्रमांक 1(वॉर्ड नंबर 6) येथील रहिवासी असून नगरपररिषदच्या नगराध्यक्षा सुध्दा याच वॉर्डात राहतात.प्रदीप गुडेल्लीवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.परंतू लोकसंख्येच्या तुलनेत येथे देशी दारू फार कमी आहे.इतर वॉर्डात दारू दुकाने आहे, मात्र आपल्या वॉर्डात एकही दारू दुकान नाही. आपल्या कृपेने काही महिन्यांपूर्वी प्रभाग क्रमांक 1 जवळील प्रभाग क्रमांक 5 येथे दुसऱ्या ठिकाणची स्थलांतरित नवीन दारू दुकान आले. येथील लोकांना सुविधा झाली परंतू सुसाट वाहतूक असलेल्या हायवे क्रॉस Highway Cross करून त्या दुकानात ये-जा करणे मोठे जिकरीचे ठरत आहे.भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच नुकतेच या हायवेचे काम सुद्धा सुरू झाले आहे,येत्या काही दिवसात उडान पूलाची निर्मिती होणार आहे.पूल बनल्यावर आपले वॉर्डातील नागरीकांचा त्या दारू दुकानाशी संपर्क तुटणार आणि आपल्या वॉर्डातील मद्य प्रमींची Alcoholic मोठ्याप्रमाणात गैरसोय होणार आहे.गडचांदूर शहरात 6 वी नवीन दारू दुकान येत असल्याची चर्चा असून यासाठी नगरपरिषदेकडे ना-हरकत noc मागितल्याचे कळते.तेव्हा किमान एक तरी दारू दुकान आपल्या वॉर्डात आणावे जेणेकरून येथील मद्य प्रेमींना सोईचे होईल.
 हे जर आपल्या कार्यकाळात नाही झाले तर पुढे कधीही होणार नाही हे मात्र विशेष.तरी कृपया आपल्या कार्यकाळात आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये किमान एक तरी देशी दारूची दुकान आणावे अशी कळकळीची विनंती वजा मागणी प्रदीप गुडेल्लीवार यांनी नगराध्यक्षाकडे केली आहे.एकीकडे ठिकठिकाणी दारूच्या दुकानाला विरोध होत आहे, तर दुसरीकडे याठिकाणी दारू दुकानाची मागणी केली जात आहे.आता नगराध्यक्षा त्यांच्याच वॉर्डातील रहिवासी गुद्देलीवार यांची मागणी पूर्ण करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
Demand for liquor shop in Mayor's ward..
                        --------//--------
                      
                  मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या