Subscribe Us

header ads

भाऊ,नाद करायचं नाही..!

@korpanalivenews..
   हौसेला मोल नसतं,समाजात आपण बऱ्याचदा पाहतो की,बरेच असे शेतकरी आहेत की,त्यांना अनेक प्रकारच्या पशुपालनाची हौस असते व त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची किंमत मोजायला तयार असतात.अनेकदा आपण माध्यमांमधून बातम्या वाचत असतो की,लाखो रूपये किमतीत रेडा किंवा शर्यतीचे बैल विकत घेतले जातात.पैशाला महत्त्व न देता केवळ हौसेपोटी अशा मोठ्या किमतीत खरेदी,विक्री केली जाते.आपण बऱ्याचदा बैलांना मिळणाऱ्या किमतीच्या बाबतीत वाचले किंवा ऐकले असेलच. परंतु एखाद्या गाईला लाखात किंमत देत तिची खरेदी करणे हे खूप कमी प्रमाणात ऐकायला किंवा वाचायला येते.परंतु एका शेतकऱ्याने तब्बल अडीच लाख रुपये देत डेन्मार्क जातीच्या गाईची खरेदी केली आहे.The farmer bought a cow of "Denmark" breed worth two and a half lakhs.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की,मंचर येथील शेतकरी गणेश खानदेशे यांनी "डेन्मार्क" Denmark जातीची सोनू Sonu नावाची 1गाय तब्बल 2 लाख 51हजार रूपयांना विकत घेतली असून सध्या सोशल मीडिया Social media वर या गाईची खूप चर्चा सुरू आहे.गणेश यांनी सोलापूर येथील शेतकरी संजय यांच्याकडून डेन्मार्क जातीची जास्त दूध देणारी गाय तब्बल अडीच लाखांत खरेदी केली आहे.यापूर्वी विचार केला तर गणेश यांनी त्यांची 1 गाय तब्बल 1 लाख 31 हजार रूपयांना विकली होती व त्याचीही चर्चा बरीच झाली होती.सोनू गाय घेतल्यानंतर गणेश यांच्या घरी गाईचे आगमन झाले.त्यावेळी त्याचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.या गाईला राहण्यासाठी सुसज्ज असा गोठा तयार करण्यात आला.यामध्ये 24 तास पाण्या व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच गोठ्याची निर्मिती करताना ती मुक्त संचार पद्धतीची करण्यात आली.या गाईला फिरण्यासाठी खूप मोठी जागा ठेवण्यात आली आहे.ऐवढेच नाही तर तिचे व्यवस्थापन करताना विशेष काळजी देखील घेतली जाणार आहे. Denmark cow.
             "डेन्मार्क जातींच्या गाईंचे वैशिष्ट्ये"
या जातीच्या गाई अतिशय शांत व सर्वगुणसंपन्न असतात.अतिशय शांत स्वभाव तसेच जास्त दूध देणाऱ्या जातीवंत गाई असतात.सोनू गाईचा विचार केला तर ती साडेचार वर्षाची असून तिचे वजन 9 क्विंटल व उंची 6 तर लांबी जवळपास 8 फूट एवढी आहे.Characteristics of cows of Denmark breeds.या गाईच्या शरीराचा पुढील भाग लहान व मागील भाग मोठा तसेच कान व डोळे,डोके लहान,गुडघ्याच्या वर कासेची ठेवण, सडात योग्य अंतर,रंगाने काळी आणि पायाचा मागील भाग सरळ असा आहे.डेन्मार्क जातीच्या सोनू गाईचे वैशिष्ट्य म्हणजे या गाईचे दूध देण्याची क्षमता प्रत्येक दिवसाला 40 ते 42 लिटर Liter इतकी आहे.
The farmer bought a cow of "Denmark" breed worth two and a half lakhs...
                          --------//-------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या