Subscribe Us

header ads

यांच्यासाठी मुनगंटीवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा...

@Korpanalive News..
           चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान 3 महिन्यांच्या आत देणे आता बंधनकारक करणार असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना यापुढे दुप्पट अनुदान Double subsidy देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य,वन व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत केली. यासंदर्भात विधान परिषद सदस्य विलास पोतनीस यांनी 31ऑक्टोबर 2022 अखेर 259 प्रलंबित चित्रपट परीक्षणाबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. Mungantiwar's major announcement for National Award winning films.मुनगंटीवार पुढे म्हणाले की,केवळ 2 वर्षाच्या आतील चित्रपट हे अनुदानासाठी पात्र राहणार असून,प्रेरणादायी चित्रपटांसाठी आता 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान मिळणार आहे.                  
         राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. 2020-2022 या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनुदानासाठी अर्ज करण्यात आलेल्या एकाही चित्रपटांचा परीक्षण Review of films करण्यात आला नाही,याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.स्क्रीनिंगसाठी थियेटर एकच असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.ही संख्या वाढावी यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.चित्रपट अनुदानपात्रतेसाठी चौकट आखली जात आहे, तसेच या अनुदानात काही बदल प्रस्तावित आहे, त्याचप्रमाणे प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटीपेक्षा जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
Mungantiwar's major announcement for National Award winning films...
                 ---------//--------
                  
               मुख्यसंपादक
             सै.मूम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या