गडचांदूर:-@महिला दिन विशेष...
घरात अठराविश्वे दारिद्र्य,शेती नाही,वाडी नाही.लग्नानंतर एक मुलगा व एक मुलगी झाली. पती रोज मजूरी करीत होता.अशातच दोन्ही मुले इयत्ता 5 व,6 वीत शिक्षण घेत असताना पतीचे निधन झाले.मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे,समाजात मोठे स्थान मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी मोलमजूरी केली.ही यशोगाथा success story आहे कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 5 येथे एका लहानशा घरात राहत असलेल्या ''छाया निर्दोष पिदुरकर'' आशाताईची. A Mauli's success story.
जवळ न पैसा,न शेतीवाडी,पहिल्या पासूनच हलाकीचे जीवन जगत असताना 2005 मध्ये पतीचे निधन झाले.कर्ता पुरुष गेल्यानंतर एकाकी पडली,मात्र खचली नाही.अशा परिस्थितीत मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हीने शेतात काम व मोल मजूरी करून संसाराचा गाडा चालवला. यामध्ये तीला वडील महादेव भिवसन परसुटकर यांनी आधार देत पुढे जाण्यासाठी हिम्मत दिली. मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करीत होती आणि खाण्यापिण्याचा खर्च वडीलच करीत होते. वडील विठ्ठला सारखा उभा राहून वाटेल ती मदत व नातवाला योग्य ते मार्गदर्शन करत असताना हिने मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले.मुलाने पदवी पर्यंत शिक्षण घेतले सोबतच त्यांनी डीएड D.Ed पण केले आहे.अशातच त्याला पोलिस विभागात शिपाई म्हणून नोकरी लागली,तो गोंदिया येथे कार्यरत आहे.तो डॉकस्कॉट C 16 Dockscott मध्ये असून नक्षली भागात राहून देश सेवा करीत आहे.मुलीचे लग्न झाले तीपण आपल्या घरी सुखी आहे.2010,11मध्ये आशावर्कर म्हणून लागलेली छायाताई आता वार्डीतील लोकांना आरोग्याची सेवा देत आहे. कोरोना काळात जेव्हा सगळे जग थांबले होते, तेव्हा एकीकडे ही माऊली घरोघरी जाऊन लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत होती आणि हे कार्य आजही अविरत सुरू आहे.तर दुसरीकडे मुलगा पोलिस म्हणून देशासेवा national service करीत आहे.या माऊलीने हिम्मत,जिद्द व मेहनतीने उभी राहून स्वप्नांना साकार केल्याबद्दल या महिला दिनी छायाताईंना "कोरपना Live" चा मानाचा मुजरा.

A Mauli's success story....
The success story of a mauli who made children with tireless hard work....
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या