कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत हल्ली काय चालले हे कुणालाच कळेनासं झालं आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कारभारावर लक्ष केंद्रित केले तर "काय ती नगरपरिषद,काय ते कारभारी,सर्व काही ओक्के" अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.मागील 2,3 वर्षापासून शहरात बरीच कामे मुदत संपल्यावर ही अपूर्ण आहे.काहींचे तर चक्क उद्घाटन झाले तरीपण कामाला सुरूवात झाली नाही.जी कामे सुरू आहे त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र आहे.निव्वळ स्वतःचा लाभ कसा होईल याकडे लक्ष असल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून विवीध कामांना घेऊन जनता बोंबाबोंब करीत असताना याकडे दुर्लक्ष करून येथील कारभार्यांनी स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे खळबळजनक आरोप होत आहे.अगोदरच याठिकाणी 5 देशी दारू व 16,17 बीअर बार, बीअर शॉप असून 2,3 बीअर बार पुन्हा येण्याच्या मार्गावर आहे.असे असताना पुन्हा एका देशी दारू दुकानाला NOC चा विषय येत्या 15 मार्चच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला.या पार्श्वभूमीवर मात्र यामध्ये अचानकपणे एक ट्विट Tweet आल्याने सदर दारू दुकानाच्या NOC वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Question mark on NOC of Liquor Shop.?
"अर्जदार श्री.प्रभाकर गंगाराम शिंदे,सुचिता प्रभाकर शिंदे तर्फे श्री.सुमित रा.विश्वास राहणार वरोरा नुसार गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील मो. वाजीद मो.शम्मी यांच्या मालकीच्या जागेत माणिकगड रोड येथील मालमत्ता प्लॉट क्रमांक 9 मध्ये अनुज्ञाप्ती क्रमांक 60 देशी दारूचे दुकान लावण्यास ना-हरकत प्रदान करण्याबाबत, विचारविनिमय करून निर्णय व इतर विषयांसंदर्भात येत्या 15 मार्च रोजी नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.दारूच्या विषयावर विरोधी पक्ष नगरसेवक,समाजसेवक व सुज्ज्ञ नागरिक विरोध opposition दर्शवित असतानाच सदर जागा मालक मो.वाजीद मो. शम्मी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना पत्र देऊन रूम देण्यास स्पष्टपणे नकार देत ना-हरकत देण्यावर आक्षेप नोंदवला आहे.
वाजीद यांनी दिलेल्या निवेदनानुसार असे की,मागील 6 महिनांपासून सदर रूम किरायाने देण्याचा विचार मी करत आहे.अशातच 1 महिनापुर्वी वरोरा येथील सुमित विश्वास हे माझ्याकडे रूमसाठी आले.किरायाबाबत Regarding rent चर्चा झाली,अनामत रक्कम दिली नाही आणि विशेष म्हणजे दारू दुकानासाठी रूम पाहिजे याविषयी ते काहीही बोलले नाही.परंतू गेल्या 2,3 दिवसापासून शहरात चर्चा discussion ऐकायला मिळत आहे की, माझ्या रूम मध्ये दारूची दुकान लागणार आहे. याविषयी सखोल माहिती घेतली असता समजले की,सुमित विश्वास यांनी माझ्या रूम मध्ये दारू दुकान लावण्यासाठी नगरपरिषदकडे ना-हरकत NOC मिळावी म्हणून अर्ज केला.परंतू मी कुठलाही अर्ज केलेला नाही,त्यांच्या सोबत माझा कुठलाही करार झालेला नाही,मी कुठलीही सही केलेली नाही,मला कुठल्याही दारू दुकानाला रूम द्यायचे नाही,जरी विश्वास यांनी माझ्या रूममध्ये दारू दुकानासाठी ना-हरकत NOC मागितली असेल तर माझा यावर आक्षेप आहे.याला माझ्या जागेवर ना-हरकत देवू नये,दिल्यास तर मी मान्य करणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी Responsibility आपल्यावर राहील,असे जागा मालक वाजीद यांनी दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.The statement said.आता यासंदर्भात नगराध्यक्षा व मुख्याधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Question mark on NOC of Liquor Shop..?
The subject of "alcohol" was in the general meeting on March 15...
--------//--------
Question mark on NOC of Liquor Shop..?
The subject of "alcohol" was in the general meeting on March 15...
--------//--------
0 टिप्पण्या