#korpanalivenews...
रामनवमी निमित्ताने 30 मार्च रोजी ठिकठिकाणी राम भक्तांनी शोभायात्रा काढली होती.याच पार्श्वभूमीवर नागपूर येथेही शहरातून ऐतिहासिक अशी शोभायात्रा काढण्यात आली.गेल्या 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात सण,उत्सव साजरे होत असल्याने या शोभायात्रेत भाविकांची अलोट गर्दी झाली होती.Crowd of people. अशातच पाय लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात भांडण सुरू झाले.प्रकरण हाताघाईवर पोहोचले.धक्काबुक्की सुरू असताना एक 53 वर्षीय महिला पायऱ्यांवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. woman fell down the stairs.सदर घटना बर्डी येथील फॉर्च्युन मॉल येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली संतोषी बिनकर रा.बालाजीनगर,मानेवाडा असे मृत महिलेचे नाव आहे.त्या बहिणीचे कुटुंब व अन्य नातेवाईकां सोबत शोभायात्रा पाहण्यासाठी बर्डी परिसरात गेल्या होत्या.A woman died after falling down the stairs.
काही दिवसांपूर्वी संतोषी यांचे पित्ताशयाचे ऑपरेशन झाले होते.त्यांना उभे राहण्यासाठी त्रास होत असल्यामुळे नातेवाईक त्यांना जवळच्या फॉर्च्युन मॉलच्या आत पायऱ्यांवर बसण्यासाठी घेऊन गेले असता तिथेच ही घटना घडली.संतोषी, त्यांची बहिण व अन्य नातेवाईक मॉलच्या पायऱ्यांवर बसले असताना इतरांचे पायऱ्यांवरून येणे-जाणे सुरू होते.एका अनोळखी व्यक्तीला संतोषी यांच्या बहिणीचा पाय लागला.यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.आरोपीने शिवीगाळ सुरू केली.वाद वाढू नये,या दृष्टीने संतोषी व त्यांचे अन्य नातेवाईक मध्यस्थीसाठी मध्ये पडले.पण, त्याचा उलट परिणाम झाला.आरोपीच्या मदतीसाठी आणखी तीन महिला धावून आल्या. एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली.त्यातच धक्का लागून संतोषी या पायऱ्यांवरून खाली पडल्या.त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.कसेबसे गर्दीतून वाट काढत त्यांना पंचशील चौकातील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.पण,तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले.या घटनेमुळे बिनकर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडून शोककळा पसरली.सदर प्रकरणी धंतोली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केल्याचे कळते.यंदा शोभायात्रेचे 57 वे वर्ष होते.पोद्दारेश्वर राम मंदिरचे शताब्दी वर्ष असल्याने दरवर्षीपेक्षा शोभायात्रेची भव्यता जरा जास्तच होती.शोभायात्रा पाहण्यासाठी भाविकांची देखील मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
A woman died after falling down the stairs...
---------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

0 टिप्पण्या