News@Liquor shop...
गडचांदूर शहरात 5 देशी दारूची दुकाने असताना पुन्हा एक नवीन स्थलांतरित दारू दुकानाचे लवकरच प्रभाग क्रमांक 2 मध्ये आगमन होणार असल्याचे संकेत मिळत आहे.ना-हरकत NOC साठी संबंधित दुकानदाराने नगरपरिषदेकडे अर्ज केल्याचे कळते.15 मार्च रोजी नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.त्यामध्ये शहरातील इतर विषयांसह दारू दुकानाचा विषय सुद्धा ठेवण्यात आला.मात्र जूनी पेन्शन old pension च्या मागणीला घेऊन कर्मचारी संपावर असल्याने सभा पुढे ढकलण्यात आली आणि आता येत्या 29 मार्च रोजी सभा होणार असल्याची माहिती आहे.दारूच्या दुकानाला ना-हरकत देवू नये,मी अशाप्रकारच्या कोणत्याही दुकानाला रूम (जागा)देणार नाही,याला माझा विरोध आहे,एवढ्यावर ही जर ना-हरकत दिले तर जबाबदार नगरपरिषद राहील,अशा आशयाचं पत्र सदर जागा मालकाने नगरपरिषदेला पूर्वीच दिले आहे.अगोदरच दारू दुकानाच्या विरोधात शहरातील नागरिक नरपरिषदेला धारेवर धरत असताना नगरपरिषदेने एकामागे एक देशी दारू दुकानाला ना-हरकत देण्याचा सपाटा लावला आहे.याच पार्श्वभूमीवर ज्या प्रभागात हे दारू दुकान येणार आहे ? त्या प्रभागातील महिलांनी स्वाक्षरी मोहीम राबवून विरोध केला आहे. Women have protested by conducting a signature campaign.

"नगरसेवक डोहे करणार तिव्र विरोध."
गडचांदूर नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी जणू स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्याची मालिकाच सुरू केली आहे.मला समजत नाही वारंवार जनतेच्या विरोधात जाऊन नगराध्यक्षा दर 5,6 महन्यांनी एक ना एक स्थलांतरित दारू दुकानाचा विषय सर्वसाधारण सभेत का ठेवतात. यामध्ये यांचे काय हित दडलंय,हे कळेनासे झाले आहे.यापुर्वी स्थलांतरित नवीन दारू दुकानाला विरोध करून यांचे मनसुबे मी उधळून लावले, आता हे तर माझ्या प्रभागातील समस्या आहे.मी शेवटपर्यंत या दारू दुकानाला विरोध करून याला कदापि माझ्या प्रभागात येऊ देणार नाही.असे मत नगरपरिषदेत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी "कोरपना Live" पुढे व्यक्त केले आहे.
--------//-------
प्रभाग क्रमांक 2 येथील 56 च्या जवळपास महिलांनी स्वाक्षरीसह नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून सदर ठराव नामंजूर करण्याची विनंती महिलांनी केली आहे.आता यासंदर्भात सभेत काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Women's opposition to that new liquor shop...
Women have protested by conducting a signature campaign...
----------//---------

मुख्यसंपादक
सै.मुम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

0 टिप्पण्या