Subscribe Us

header ads

"जागतिक चिमणी दिन’' World Chimney Day...

गडचांदूर:-News@Chiutai..
    पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जीवजंतू, प्राणी,पक्षी इतर निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे.आपले जगणे आणि भावी पिढीचे बालपण निसर्गरम्य करण्यासाठी इतरांसह चिऊताई नक्कीच हवी.म्हणून चिऊ, चिऊच्या आवाजाने आपल्या आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचे अस्तित्व अन् वैभव जपणे गरजेचे.याच पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणार्‍या पक्षांना तहान मिटवण्यासाठी गडचांदूर येथील तरूणांची चिमुकल्यांच्या सोबतीने  "जागतिक चिमणी दिन" World Chimney Day झाडावर पाण्याच्या बाटल्या लटकवून साजरा केला.World Chimney Day was celebrated by hanging water bottles on trees.
         सध्या देशभरात चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.त्यातील अनेक जाती तर इतिहास History जमा झाल्या. जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद तसेच यातील 23 चिमण्यांची छायाचित्र Photograph सध्या उपलब्ध असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. चिमण्या लुप्त होत असल्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.असे असताना पक्षीप्रेमी bird lover आपापल्या परीने यांच्या संरक्षणासाठी झटत असलयाचे चित्र असून वृक्षप्रेमी महेश देरकर,नयन मालेकर,स्वप्नील माणूसमारे,अजीत उरकुडे,सर्वध वनकर आदी तरूणांनी चिमुकल्यांच्या सोबतीने चिऊताईसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून झाडावर पाण्याच्या बाटल्या लटकवल्या आहे.
World Chimney Day was celebrated by hanging water bottles on trees...
Little children arranged water for Chiutai...
                         --------//--------
                      
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
  मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या