Subscribe Us

header ads

कासवाचे वजन 120 किलो. The weight of the turtle is120 kg.

News@Turtle...
          फेब्रुवारी महिन्यात नागपूर येथील नाईक तलावाच्या काठावर सौंदर्यीकरणात आढळलेल्या एका कासवाला पकडण्यात आले.या कासवाचे वजन तब्बल 120 किलो असून सर्वसामान्य कासवापेक्षा आकाराने अधिक मोठा आहे.याला पकडण्यात 16 एप्रिल रोजी मनपाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.सदर कासवाला ट्रॉझिट ट्रिटमेंट सेंटर Trozit Treatment Center च्या स्वाधीन करण्यात आले असून तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याला त्याच तलावात सोडणार असल्याचे कळते.The weight of the turtle is 120 kg.Nagpur Naik Lake.
    नागपूर महानगरपालिका तर्फे स्थानिक नाईक नगर तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास सदर कासव नागरिकांना तलावाच्या काठावर दिसला होता.त्याला बघताच अनेकांनी आरडाओरडा केल्यावर तो तलावात निघून गेला होता.याविषयीची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली.रेस्क्यु टीम Rescue team सदर ठिकाणी पोहोचली मात्र,त्यांना कासवाचे दर्शन झाले नाही.अखेर 16 एप्रिल रोजी सौंदर्यीकरणाचे काम करणार्‍या मनपा Municipality च्या कर्मचाऱ्यांना भला मोठा कासव दिसला आणि त्याला पकडण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
   सदर कासव आकाराने मोठा असून काही महिने ट्रॉझिट ट्रिटमेंट सेंटर मध्ये ठेवण्यात येईल. कासवाला पिंजर्‍यात बंद करून त्याला सेंटर मध्ये आणण्यात आले असून त्याला एका पाण्याच्या टाकीत ठेवण्यात आले आहे.हा कासव जवळपास 6 महिने सेंटरमध्ये पशुवैद्यकांच्या निगराणीत राहणार असल्याचे कळते.मागील कित्येक वर्षांपासून हा कासव सदर तलावातच असल्याने परिसरातील नागरिकांची त्याच्यावर श्रद्धा असून काम पूर्ण झाल्यानंतर कासवाला तलावात सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. कासवाला पाहण्यासाठी तलावाजवळ नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
The weight of the turtle is 120 kg...
Nagpur Naik Lake...
                            -------//-------
                       
                    मुख्यसंपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
   मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या