Subscribe Us

header ads

मधमाशांच्या हल्ल्यात 2 2 ठार,5 जखमी.2 killed, 5 injured in bee attack.

News@Bee Attack...
       सध्या शालेय परीक्षा आटोपल्या आहे.सलग सुट्या,त्यात वातावरणातील बदल,असा तिहेरी योग जुळून आल्याने राज्यभरातील पर्यटनस्थळे हाऊस फूल्ल झाली आहे.लांबवर जाणे शक्य नसलेली मंडळी "दूधाची तहान ताकावर भागविल्या प्रमाणे" जवळच्या पर्यटन स्थळांना भेटी देऊन हौस भागवून घेत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षण केंद्र Talodhi Balapur Forest Experiment Center in Chandrapur District आणि तळोधी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरातील पेरजागड येथील 7 बहिणींचा डोंगर Seven sisters hill at Perjagad in Govindpur area म्हणून प्रसिद्ध आहे.सुटीच्या दिवशी कायम येथे पर्यटकांची गर्दी असते. शनिवारी नागपूरचे पर्यटक येथे आले होते.त्यांची भटकंती सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला Tourists were attacked by bees केला.त्यात दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले.जखमींमध्ये 6 महिन्यांच्या चिमुकलीसह महिलांचा देखील समावेश आहे. Tourists were attacked by bees.
        अशोक विभीषण मेंढे 62 आणि गुलाबराव पोचे 58 अशी मृतांची नावे असून दोघेही नागपूर येथील रहिवासी आहे.मधमाशांचा हल्ला ऐवढा आक्रमक स्वरूपाचा होता की,मेंढे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर उपचारासाठी नेत असताना वाटेत पोचे यांचा मृत्यू झाला.नागपूरचे पर्यटक डोंगरावर पोहोचले.निसर्गरम्य वातावरणात संपूर्ण दिवस घालविण्याचा त्यांचा बेत होता.पण,जवळचे पोळे फुटले आणि मधमाशांनी Bee's या पर्यटकांवर हल्ला चढविला. सर्वांगावर चावा घेत असल्याने सर्वांचीच पळापळ सुरू झाली.जीवाच्या आकांताने सारेच जण आरडाओरड करीत स्वतःच्या बचावाचा प्रयत्न करीत होते.दीर्घकाळ मधमाशांकडून डंख मारणे सुरूच होते.सायंकाळी वनविभागाला या घटनेबाबत माहिती मिळाली.लागलीच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे 2 बंब देखील घटनास्थळी पोहोचले.तळोधी व नागभीड पोलीस आणि नेचर केअर संस्थेचे पदाधिकारी व सदस्य घटनास्थळी पोहोचले.गुलाबराव पोचे यांचा शोध लागत नव्हता.शोधाशोध केल्यानंतर ते अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले.तातडीने त्यांना डोंगरावरून खाली रुग्णवाहिकेत नेण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.त्यापूर्वीच डोंगरावर मधमाशांच्या दंशामुळे अशोक मेंढे यांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत मोहीम सुरू होती.पुढील तपास तळोधी पोलीस व तळोधी वनविभाग करीत आहे.
Bee attack..
Tourists were attacked by bees...
Seven sisters hill at Perjagad in Govindpur area..
                           --------//-------
                        
                   मुख्यसंपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
   मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या