Subscribe Us

header ads

गांजा ओढणाऱ्या 20 जणांवर पोलिसांची कारवाई.Police action against 20 people smoking ganja.

Nwes@Korpanalive...
     अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून कित्येक गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे.गांजा ganja सारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांविरुद्ध कारवाईची मोहीम यवतमाळ पोलीस दलाने हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 3 एप्रिलपासून सुरू केलेल्या मोहिमेत 20 जणांविरुद्ध केसेस Cases करण्यात आल्या आहे.संघटीत गुन्हेगारीच्या सानिध्यातून व्यसनाधिनता व त्यातून जन्माला येणारी गुन्हेगारी याचा विचार करून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. त्यानुसार मोहीम राबविण्यात आली.त्यामध्ये विवीध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 20 केसेस करण्यात आल्या आहे.यात यवतमाळ शहर पोलिस ठाणे 3,अवधूतवाडी 3,दारव्हा 1,नेर 2, पुसद शहर 3,खंडाळा 1,उमरखेड 2,आर्णी 2, बाभूळगाव 1 आणि वणी 2,याप्रमाणे केसेस करण्यात आल्याची माहिती आहे.
Police action against 20 people smoking ganja..
                         --------//--------
                         
                            मुख्यसंपादक
                           सै.मूम्ताज़ अली.
         मो.9595630811,9049358699.
                               


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या