News@Korpanalive...
विदर्भात अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून ऐन उन्हाळ्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने आर्थिक व जीवितहानी होत आहे.यामुळे नागरिकांना विवीध प्रकारचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याच श्रेणीत 24 एप्रिल रोजी कोरपना तालुक्यातील नांदा-बीबी-गडचांदूर परिसरात सायंकाळी अंदाजे 4 च्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल झाला.मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली यावेळी गडचांदूर येथील जब्बार हे बिबी येथील स्वप्निल टोंगे यांच्या शेतशिवारात आपल्या मेंढ्या चारत होते.मात्र अचानकपणे मेंढ्यांच्या कळपावरती वीज कोसळल्याने 36 शेळ्या,मेंढ्या जागीच ठार झाल्या तर 6 ते 8 जनावरांना गंभीर दुखापत झाली असून त्या सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता कमीच असल्याची शंका व्यक्त होत आहे.यामुळे जब्बार कुरेशी यांचे जवळपास 5 लाखांच्या वर नुकसान झालेले आहे.

घटनेची माहिती वनविभाग व महसूल विभागाला मिळताच क्षेत्राचे पटवारी जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.अचानक ओढवलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
36 sheep died due to lightning in Gadchandur-Bibi Farm Shiwar...
--------//--------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या