Subscribe Us

header ads

A friendship on Facebook led to marriage. फेसबुकवर झालेली मैत्री लग्नापर्यंत पोहोचली,मग घडले असे...

News@Korpanalive...
       वरोरा तालुक्यातील निलजई येथे 25 एप्रिल मंगळवार रोजी अल्पवयीन मुलगा आणि वयात आलेल्या मुलीचा होणार असलेला बालविवाह थांबविण्यात आला असून प्रेम प्रकरणातून सदर प्रेम विवाह होत असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना मिळाली. सदर माहितीनुसार पोलीस निरीक्षक काचोरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, यांच्या मार्गदर्शनात महिला समुपदेशक Women Counsellor योगिता लांडगे यांना सोबत घेऊन पोलीस पथकासह निलजई गाव गाठले आणि बेकायदेशीर रित्या होणाऱ्या प्रेमविवाह ठिकाणी धडक दिली.यावेळी त्याठिकाणी लग्न कार्याची लगबग सुरू होती.पोलिसांना पाहून सर्वांची तारांबळ उडाली.Child marriage is a crime under the Act.
       दरम्यान पोलीस निरीक्षकांनी वर आणि वधूच्या वयाचे दाखले मागितले.तेंव्हा वर मुलास 21 वर्ष पूर्ण व्हायचे दिसून आले.यानंतर महिला समुपदेशक आणि पोलीस निरीक्षक यांनी बालविवाह झाल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती मुला,मुलीचे पालक आणि उपस्थित ग्रामस्थांना दिली.तसेच अल्पवयीन मुलास बालकल्याण समिती Child Welfare Committee समोर हजर करण्याच्या सूचना दिल्या.यानंतर सदर विवाह रद्द करण्यात आला. आता हा विवाह मुलाचे वय 21वर्ष पुर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे.दरम्यान भावी वधू रायगड येथील असल्याची आणि तिथे तिच्या पालकांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दिली असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आल्याचे कळते.दोघांची फेसबुकवर ओळख, मैत्री झाल्याची कबूली त्यांनी दिली असून दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे यांचे म्हणणे आहे. सज्ञान असल्याने मुलीला रायगड येथे त्याच्या घरी जाण्यासाठी आग्रह धरला जाऊ शकत नसल्याने ती सध्या तिच्या संमतीने निलजई येथे त्या मुलाच्या घरीच वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
A friendship on Facebook led to marriage...
Child marriage is a crime under the Act...
                            -------//-------
                   
                    मुख्य संपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
    मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या