News@Bus Station...
औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले शहर गडचांदूर Gadchandur City,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर आहे.मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त हजारो नागरिक दररोज याठिकाणी येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात साधे बसस्थानक नाही आणि यासाठी आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला नाही ! ही लज्जास्पद बाब असल्याची खेद व निषेध वंचित बहूजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी नोंदविला आहे.याठिकणी सर्वसोयी सुविधायुक्त बसस्थानक bus station उभारण्यात यावे यासाठी गडचांदूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून सदर प्रश्नावर येत्या 7 दिवसाच्या आत सकारात्मक उत्तर व लेखी आश्वासन न मिळाल्यास गडचांदूर येथे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा फुसे यांनी निवेदनातून दिला आहे. Vanchit Bahujan Aghadi has warned of agitation if no positive decision is taken within 7 days.

2014 मध्ये गडचांदूर नगर परिषदेची स्थापना झाली मात्र आजतागायत गडचांदूरला कायम स्वरूपी बसस्थानक नसल्याने येथे येणार्या जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.तीनही ऋतूत three seasons बसच्या प्रतिक्षेत बिचाऱ्या निष्पाप लोकांवर इकडे-तिकडे उभे राहण्याची नामुष्की ओढावली आहे.विशेषता: चिमुकल्या बाळांची माता,वयोवृद्ध स्त्री,पुरूष व लहानमोठे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.लोकांची गर्दी पाहता येथे मोठे व सूसज्ज बसस्थानक होणे अत्यंत गरजेचे आहे मात्र असे होताना दिसत नाही.बसस्थानक नसल्यामुळे नाईलाजास्तव लोकांना प्रसाधन गृहापुढे बसून बसची वाट पहावी लागत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.बसस्थानक संदर्भात येत्या 7 दिवसाच्या आत सकारात्मक उत्तर व लेखी आश्वासन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना यावेळी वंचित बहूजन आघाडीचे तालूका महासचिव राजेंद्र नळे, महेंद्र ठाकूर व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
After all, how many days of hell would you have to suffer...?
Vanchit Bahujan Aghadi has warned of agitation if no positive decision is taken within 7 days...
-------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या