Subscribe Us

header ads

Atiq Ahmed, brother of Ashraf कुख्यात डॉन अतिक अहमद,भाऊ अश्रफची गोळ्या झाडून हत्या.

News@prayagraj...
 कुख्यात डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ,या दोघांवर प्रयागराज येथील मेडिकल कॉलेज परिसरात गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या वेशात आलेल्या 3 मारेकऱ्यांनी अगदी पोलिसांच्या वेढ्यातही या दोघांना जवळून गोळ्या झाडल्या.त्यात अतिक व अश्रफ हे दोघेही घटनास्थळीच ठार झाले.शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली.मारेकऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून तिघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.मारेकरी नेमके कोण आहे ? हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही.विशेष म्हणजे अनेक वाहिन्यांच्या कॅमेरामध्ये ही घटना देखील लाईव्ह रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले.
                  "अशी घडली घटना…"
   शनिवारी रात्री अतिक अहमद व अशरफ या दोघांना कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत होते.पोलिसांचे वाहन त्यांना घेऊन रुग्णालयापुढे थांबले व दोघांना वाहनातून बाहेर काढण्यात आले.त्याचवेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे कॅमेराचे बुम पुढे करून अतिक अहमद याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीच्या रुपात तिघे जण हातात बनावट बुम घेऊन त्यांच्यात मिसळले होते.अतिक अहमदने प्रसार माध्यमांशी बोलणे सुरुच केले होते. अचानक त्याच्या कनपटीवर पहिली गोळी झाडण्यात आली.त्यानंतर लगेच अशरफ देखील गोळी झाडण्यात आली.यानंतर मारेकऱ्याने दोघांवर गोळ्यांचा पाऊस पाडला.ही घटना घडली त्यावेळी दोघांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या पोलिसांची अक्षरशः तारांबळ उडाली. अतिक व अशरफ यांना जागीच ठार मारता येईल, या योजनेनेच मारेकरी तेथे पोहोचले होते.यानंतर पोलिसांनी तिघांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.घटनास्थळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असल्याने या हल्ल्याचे दृष्य अनेकांनी कॅमेरामध्ये टिपले.जखमी अवस्थेत अतिक व अशरफ या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दोघांचा मृत्यू घटनास्थळीच झाल्याचा अंदाज आहे.या घटनेमुळे उत्तर प्रदेश पोलिस दलात प्रचंड खळबळ माजली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलिस महासंचालकांना तात्काळ बोलावून घेतले व त्यांच्याशी या घटनेवर चर्चा केली.
           "सकाळीच मुलावर अत्यसंस्कार."
    अतिकचा मुलगा असद व त्याचा साथीदार गुरुवारी रात्री एका एन्काऊंटर मध्ये ठार झाला.या एन्काऊंटर बाबत संशय व्यक्त होत असतानाच ही घटना घडली.शनिवारी सकाळी असद व त्याच्या साथीदाराचा दफनविधी पार पडली होती. अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी असदच्या आजोबांसह मोजक्या 20-25 नातेवाईकांनाच कब्रस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली होती. अतिक मुलाच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ शकला नव्हता.दरम्यान संपूर्ण उत्तरप्रदेश मध्ये धारा 144 लागू करण्यात आली तर 17 पोलिसांना तडकाफडकी सस्पेंड करण्यात आल्याची माहिती आहे.
                        ---------//-------
                     
                  मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या