Subscribe Us

header ads

चौथ्या वर्गातील मुलींचे दोन शिक्षकांकडून लैंगिक शोषण. Class 4 girls sexually abused by 2 teachers.

New@Korpanalive....
      चौथ्या वर्गात शिकणाऱ्या 4 विद्यार्थिनीचे 2 शिक्षकांनी लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार 5 एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यत उघडकीस आला आहे.Sexually abused by 2 teachers. गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्या नराधम शिक्षकांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून यांना तातडीने अटक केली आहे.जवळपास 2 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता.पालकांना तो समजल्यानंतर त्यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यावरून पोलिसांनी सहायक शिक्षक सुधाकर ढगे वयवर्ष 53 रा.अकोला व राजेश तायडे वयवर्ष 45 रा.अकोला,यांना अटक केली आहे.न्यायालयाने यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.Class 4 girls sexually abused by 2 teachers.
            मिळालेल्या माहितीनुसार बार्शीटाकळी तालुक्यात धामणदरी Barshitakali taluka Dhamandari गावात ही घटना घडली.हे छोटेसे गाव अकोल्यापासून अंदाजे 30 ते 40 कि.मी. अंतरावर आहे.या गावातील जिल्हा परिषद शाळेत Zilla Parishad School पहिली ते 4 थी पर्यंत वर्ग आहे.तिथे फक्त 4 मुली व 5 मुले शिक्षण घेतात.या शाळेवर या 2 शिक्षकांची नियुक्ती होती. याच 2 नराधम शिक्षक 4 ही मुलींवर 2 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते.असे असताना मात्र चाबरलेल्या मुली काहीच बोलत नव्हत्या.अखेर यातील एका मुलीने पालकांना खरं, खरं सांगितले.या पालकांनी इतर 3 मुलींच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनाही अत्याचारा बाबतची माहिती कळली.त्यांनी बुधवार 5 एप्रिल रोजी थेट बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठून शिक्षकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी शिक्षकांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक‎ कायद्यानुसार Prevention of Child Sexual Abuse Act गुन्हा दाखल केला आहे.तसेच जिल्हा परिषदेनेही या नराधम शिक्षकांना तडकाफडकी बडतर्फ केल्याची माहिती आहे.
Class 4 girls sexually abused by 2 teachers...
                              --------//------
                      
                      मुख्यसंपादक
                    सै.मूम्ताज़ अली.
     मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या