Subscribe Us

header ads

आदिवासी समाजसेवकाचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.District Superintendent of Police felicitated tribal social worker Namdev Bhosale.

News@Korpanalive...
        "मी पोलीस खात्यात आल्यापासून नेहमीच पिढीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले" असे मत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी District Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi यांनी व्यक्त केले.ते आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी घेतलेल्या त्यांच्या भेटी दरम्यान बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी साहेब यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात आदिवासी समाजसेवक व साहित्यिकांनी नामदेव भोसले पुणे यांनी भेट घेऊन आदिवासींच्या समस्यांविषयी चर्चा केली.आदिवासी पारधी बेड्यांवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन पोलीस अधीक्षक Superintendent of Police चंद्रपूर व जिल्हा परिषद मुख्याधिकारी CO यांना आदिवासी Adivasi पारधी समाजापुढे येणाऱ्या अडचणींविषयी सविस्तर माहिती देऊन पुनर्वसनासाठीचे प्रयत्न कशा स्वरूपात करता येईल,त्यांच्यापर्यंत शासकीय सुविधा कशाप्रकारे पोहचवल्या जातील,याविषयी चर्चा केली.गेल्या 20 वर्षांपासून निस्वार्थीपणे नामदेव भोसले हे काम करीत आदिवासी,पारधी आणि पोलीस, यांच्यातील अंतर कमी करून महाराष्ट्रातील 50 हजार आदिवासी कुटूंबांना यांनी न्याय मिळून दिला.पोलीस आणि पारधी यांना एकत्रित करण्याचे काम त्यांनी केले आहे.त्यांचे विशेष काम पाहून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी साहित्यिक नामदेव भोसले यांना एक पुस्तक भेट देऊन गौरव केला आहे.
District Superintendent of Police felicitated tribal social worker Namdev Bhosale...
                          --------//--------
                       
                    मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या