Subscribe Us

header ads

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration.

News@14 एप्रिल...
    गडचांदूर सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतरत्न,विश्वरत्न,बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration.
    सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे,कला विभाग प्रमुख प्रशांत खैरे,एम.सी.व्हीसी विभाग प्रमुख विजय मुप्पीडवार,ज्येष्ठ शिक्षिका चटप मॅडम व मेहरपकूरे सर होते. "प्रत्येकांनी बाबासाहेबांचे विचार,कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा,जे बाबासाहेबांनी मिळवून दिले,ती टिकवण्याची जबाबदारी सर्व सुशिक्षित व शिक्षक वृंदांची आहे.ती त्यांनी अंगी करावी" असे आवाहन मुख्याध्यापक काळे यांनी अध्यक्षस्थाना वरून विचार व्यक्त करताना केले.
       "सध्या देशात सुरू असणाऱ्या परिस्थितीच्या संदर्भात अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकृत करावे" असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक संचालन ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार बी. एस.मरसकोल्हे यांनी मानले.कार्यक्रमासाठी सुरेश पाटील,माधुरी उंमरे,सुषमा शेंडे,नामदेव बावनकर, मेश्राम सर,राजेश मांढरे,प्रा.झाडे,प्रा.सय्यद ज़हीर, प्रा.सातारकर,प्रा.कु.ताकसांडे मॅडम,प्रा.गुजर,प्रा. पोडे,प्रभाकर पुंजेकर,लीलाधर मत्ते,सिताराम पिपळशेंडे,शशिकांत चेन्ने,प्रेमचंद आदोळे इत्यादी कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration....
                         ---------//-------
                          
                    मुख्यसंपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या