Subscribe Us

header ads

वित्तीय साक्षरता व समावेशन उपक्रम.Financial literacy and inclusion activities .

News@Korpanalive...
            राजूरा तालुक्यातील कोलगाव,कोरपना तालुक्यातील कोठोडा बु.,येथे 19 एप्रिल रोजी क्रिसिल फाउंडेशन Crisil Foundation च्या सहकार्याने,भारतीय रिझर्व बँकेच्या तत्वाखाली व बँक ऑफ इंडियाBank of India च्या मार्गदर्शनाखाली वित्तीय साक्षरता अभियान Financial Literacy Campaign राबविण्यात आले.ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा,आर्थिक नियोजन,सोशल सेक्युरिटी,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,सुकन्या समृध्दी योजना,अटल पेन्शन योजना,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,बँकिंग लोकपाल या विवीध शासकीय योजनां संबंधी गावातील लोकांना माहिती देऊन गावातील नागरिकांचे शासकीय योजनांमध्ये समावेशन करण्यात आले. Financial Literacy Campaign.
          सेंटर फॉर फिनान्सियल लिटरन्सी Center for Financial Literacy जिवतीद्वारे लोकांमध्ये राजूरा,कोरपना,जिवती याठिकाणी,वित्तीय साक्षरता अभियान घडवून आणण्याचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला कोलगाव या गावातील प्रमुख पाहुणे सरपंच सौ.अनिता सुधाकर पिंपळकर,उपसरपंच पुरूषोत्तम रामदास लांडे,अक्षय निब्रड ग्राम सदस्य,शंकर पासपुते ग्राम सदस्य,सौ.चंद्रकला पेटकर (ICRP) शिपाई बंडुजी झुंगरे तसेच कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत कोठाडा बु.येथे झालेल्या कँपमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत कोठोडाचे सरपंच,रमेश मेश्राम,तंटामुक्त समिती अध्यक्ष साबीर शेख, ICRP अनिता तोडे,CFL सेंटर मॅनेजर अतुल गोरे, राजूरा तालुका सम्वयक आकाश मेश्राम,कोरपना तालुका सम्वयक आरती आडकीने व बँक ऑफ इंडिया राजूराचे BC आदेश धोटे,कोरपना येथील BC रणदिवे इतरांची उपस्थिती होती.यावेळी गावातील लोकांना बँक व पोस्ट ऑफिस मधून मिळणाऱ्या शासकिय योजना,बॅंकेतून ममिळणाऱ्या सेवा सुविधांबबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच योजनांमध्ये समाविष्ट करून गावात वित्तीय साक्षरता समिती स्थापन करण्यात आली.तसेच प्रत्यक्ष लाभ व माहिती देण्यात आली.कार्यक्रमात यावेळी मोठ्यासंख्येने महिला व पुरूषांची उपस्थिती होती.
Financial literacy and inclusion activities in villages...
                           --------//-------
                        
                     मुख्यसंपादक
                    सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या