Subscribe Us

header ads

ठाकरेंच्या आमदाराची जबरी टीका.Forced criticism of Thackeray's MLA.

News@politics...
  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची औकात काय ? असा प्रश्न करत त्यांच्यावर जबरी टीका केली आहे. "तो मंतीमंद आहे" अशा शब्दात देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर शाब्दिक हल्ला चढवला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बावनकुळे यांच्या वक्तव्यावर देशमुख संताप व्यक्त केला आहे. नितीन देशमुख म्हणाले,चंद्रशेखर बावनकुळे यांची औकात काय आहे.त्यांनी मातोश्री बाहेर उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवावे,खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे.त्यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद दिसतात.मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये अशी जळजळीत टीका देशमुख यांनी केली आहे.
  शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत संसार थाटला.जवळपास 50 आमदारांना सोबत घेत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले सत्तासंघर्षाच्या या धावपळीत महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या आमदारांपैकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे पळून आले,त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचंही स्पष्ट करत एकनाथ शिंदेवर टीका केली होती.आता उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना आमदार देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ही जबरी टीका केली आहे.
             "काय म्हणाले होते बावनकुळे"
       उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यानं मर्यादा ओलांडली आहे.पण अजूनही आम्ही त्यांना आज शेवटची संधी देत आहो. यापुढे जर आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही.तुमचं घराबाहेर पडणं मुश्कील होईल.ज्या फडणवीसांना तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी विधानं कराल असं कधीच वाटलं नव्हतं. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Forced criticism of Thackeray's MLA...
                             --------//-------
                         
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
   मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या