Subscribe Us

header ads

चंद्रपुरात रविवारी "गर्जा महाराष्ट्र माझा"Garja Maharashtra Maja...

News@Garja Maharashtra Maja...
           चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 100 नवोदित कलावंतांचा कलाविष्कार "गर्जा महाराष्ट्र माझा" Ganja Maharashtra Maja या कार्यक्रमाचे आयोजन 30 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. स्पार्क जनविकास फाऊंडेशनने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची जीवनशैली आदींचे दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे.6 महिन्यांच्या बालकापासून 70 वर्षाच्या वृद्ध कलावंतांचाही यात समावेश आहे.संकल्पना आनंद आंबेकर यांची असून दिग्दर्शन प्रज्ञा नागपुरे-जीवनकर यांचे आहे.
         नृत्य दिग्दर्शन मृणालिनी खाडीलकर-गंगशेट्टीवार यांचे असून संगीत संयोजन नंदराज जीवनकर यांचे आहे.अविनाश दोखरखंडे हे सहायक दिग्दर्शक आहे.हरिश इथापे,संजय वैद्य, प्रदीप खांडरे,शैलेश दुपारे,सुशील सहारे,गोलू बाराहाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.याच वेळी स्पार्क जनविकास फाऊंडेशनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून नव कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन स्पार्क जनविकास फाऊंडेशन Cultural of Maharashtra च्या वतीने करण्यात आले आहे.
Garja Maharashtra Maja...
                          --------//-------
                        
                   मुख्य संपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
    मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या