Subscribe Us

header ads

महामानवाची जयंती उत्साहात साजरी.The great man's birth anniversary was celebrated with enthusiasm.

News@14 एप्रिल...
 विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता,न्याय,बंधुत्व आणि एकतेचा विचार दिला. त्या विचाराची आज खऱ्या अर्थाने जगाला जास्त गरज आहे.आज संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने या महामानवाची 132 वी जयंती एक सामाजिक समता दिन म्हणून साजरी होत आहे. "या जगाला युद्ध नको,बुद्ध हवा" असा संदेश देणारे विश्वासरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इतर ठिकाणांसह  14 एप्रिल रोजी गडचांदूर शहरात मोठ्या उत्साहात व शांततामय वातावरणात साजरी करण्यात आली. Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration.
     जयंतीचे औचित्याने शहरात विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उपस्थितातर्फे बुद्ध वंदना देण्यात आली.शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहरातील राजकीय,सामाजिक व्यक्ती व इतर अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सायंकाळी एका भव्य अशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये असंख्य भीम अनुयायांनी मोठ्या हर्षोल्हासाने सहभाग नोंदवला.सदर रॅलीत उभारण्यात आलेली विवीध मनमोहक झांकी व आकर्षक रोषणाई प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.ढोलताशे व डीजेच्या तालावर नृत्य करीत असलेल्या तरूणाईचा उत्साह यावेळी वाखानन्याजोगा होता. "न भूतो न भविष्यतो" अशी या ऐतिहासिक रॅलीचे दृश्य पाहण्यासाठी एकवटलेल्या गर्दीला अक्षरशः जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या दरम्यान जय भीमच्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला.शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत रॅलीची समाप्ती बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ झाली.उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
The great man's birth anniversary was celebrated with enthusiasm...
                             --------//--------
                          
                      मुख्यसंपादक
                     सै.मूम्ताज़ अली.
    मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या