Subscribe Us

header ads

माणिकगड सिमेंट कंपनी अधिकाऱ्यांची नगरपरिषदेत बैठक.Meeting of Manikgad Cement Company officials in Municipal Council.

News@Gadchandur N.P.
     कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानल्या जाणार्‍या गडचांदूर येथील नगरपरिषदेत 13 एप्रिल रोजी माणिकगड (अल्ट्राटेक)सिमेंट कंपनीच्या नवीन अधिकार्‍यांनी स्वतः पुढाकार घेऊन सीएसआर CSR व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. जेनेकरून याद्वारे शहरात विकासात्मक कामे करता येईल.असे असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी नगरसेवकांना सुद्धा बोलावण्याची गरज होती. मात्र नगराध्यक्षांनी विरोधी पक्ष नगरसेवकांना डावलल्याचे आरोप विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.दारूच्या मुद्दयांवर आम्हाला नाही बोलावले हे मी समजू शकतो पण कंपनी अधिकाऱ्यां सोबतच्या बैठकीला न बोलावण्याचा हेतू काय ? असा संतप्त सवाल डोहे यांनी उपस्थित केला आहे.11 एप्रिल रोजी नगरपरिषदेकडून सदर बैठकीचा मॅसेज ग्रुपवर टाकण्यात आला आणि लगेच डिलिट सुद्धा केला ! यावरून आम्ही नेमकं समजायचं तरी काय ? अखेर गुप्त बैठकीच्या मागे दडलंय तरी काय ? असा प्रश्न उपस्थित करत जर बैठकीची माहिती असती तर आम्ही सुद्धा त्या अधिकाऱ्यांसोबत शहराच्या विवीध मुद्दयांवर चर्चा केली असती, समस्या मांडल्या असत्या,सीएसआर फंडातून काय करता येइल याविषयी माहिती घेतली असती,मात्र यांनी आम्हाला बैठकीतून डावलले, यामागचा हेतू काय ! हे कळनासे झाले आहे.अशी प्रतिक्रिया नगरसेवक अरविंद डोहे यांनी "कोरपना Live" ला दिली आहे.
Meeting of Manikgad Cement Company officials in Municipal Council...
                         --------//--------
                       
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या