Subscribe Us

header ads

...यांचा अखेर काँग्रेसचा सदस्यत्व रद्द.membership cancelled.

New@Political...
    सतत काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणारे नेते आशीष देशमुख यांच्यावर पक्षाने अखेर कारवाई केली असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. Ashish Deshmukh Suspended from Congress.पक्षाने त्यांना 5 एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून 3 दिवसात स्पष्टीकरण मागविले होते.देशमुख यांनी अलिकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्रा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्यावर टीका केली होती.मोदी आडनावावरून न्यायालयाने शिक्षा केल्यावर राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी,अशी मागणी त्यांनी केली होती.त्याचवेळी आशीष देशमुख हे फार काळ काँग्रेसमध्ये टिकणार नाही हे स्पष्ट झाले होते.ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील,असे संकेत मिळत आहे.काँग्रेसच्या शिस्तभंग कारवाई समितीने त्यांना 5 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती.Ashish Deshmukh's membership cancelled.
 या नोटीसीत समितीने आशीष देशमुखांनी राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला होता.सातत्याने पक्ष नेतृत्वावर टिका केल्याबद्धल पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये ? याचे 3 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते.मुळचे काँग्रेस विचारांचे देशमुख काही वर्षांपूर्वी भाजपच्याही जवळ गेले होते.भाजपच्या वतीने ते काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले होते.मात्र,नेत्यांशी बिनसल्याने त्यांनी 4 वर्षापूर्वी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता.
Ashish Deshmukh's membership cancelled...
                             --------//-------
                          
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
   मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या