Subscribe Us

header ads

अजित पवार/राऊत मध्ये "वाकयुद्ध"Ajit Pawar/ Sanjay Raut.

News@Politics...
        राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील शीतयुद्धाला आता वाकयुद्धाचे स्वरुप आले आहे. Cold war between Ajit Pawar and Sanjay Raut intensifies.भाजप बरोबर जाण्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण देताना पवारांनी संजय राऊतांना फटकार लगावली होती.त्यामुळे नाराज झालेल्या संजय राऊतांनी देखील अजित पवारांवर पलटवार केला. “मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा ऐकतो,इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही” असे संजय राऊत म्हणाले. “शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात.आता मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडत आहात ?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. "अजित दादांनीच भाजपचा काय डाव आहे ? हे स्पष्ट करून सांगावे” असे आव्हानही राऊतांनी यावेळी दिला आहे.
   "मी मविआचा चौकीदारमी बोलत राहणार.!
दरम्यान,सामनातील रोखठोक सदरात मी चुकीचे लिहिलेले नाही.विरोधी पक्षाच्या आमदारांवर दबाव टाकला जात असल्याचे स्वतः शरद पवार सांगत आहे.त्यांनी पंतप्रधान,गृहमंत्र्यांना पत्र देखील दिले आहे.तेच मी सामनात लिहिले तर चुकीचे काय ? मी यापुढेही लिहीत राहणार,बोलत राहणार,कोणाला टोचत असेल तर मी काय करू ? असेही राऊत म्हणाले.मी मविआचा चौकीदार असल्याचेही राऊत म्हणाले.
               "काय म्हणाले अजित दादा ?"
“इतर पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वकीली करू नये” अशा शब्दांत अजित पवारांनी संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
 Cold war between Ajit Pawar and Sanjay Raut intensifies...
                              --------//--------
                          
                      मुख्यसंपादक
                     सै.मूम्ताज़ अली.
    मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या