Subscribe Us

header ads

...या ठाणेदाराची कामगिरी कौतुकास्पद.The performance of this Thanedar is commendable.

News@Korpanalive...
           पोलीसांवर नेहमी विवीध प्रकारचे आरोप होत असतात मात्र बऱ्यादा कौतुक सुद्धा होते.असे असताना एका प्रकरणात भद्रावती तहसीलच्या माजरी पोलीस स्टेशन ठाणेदाराची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.एक मद्यपी खिशात 52 हजार रूपये घेऊन बेशुद्धावस्थेत पोलिसांना सापडला.त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केल्यानंतर ती रक्कम त्याच्या कुटुंबीयांना परत केली.Commendable performance by Thanedar.
   यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार असे की,माजरी येथील पळसगाव मोड येथे शुक्रवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास सफाई कामगार मुर्गेशन शेट्टी वयवर्ष अंदाजे 50,रा.माजरी कॉलरी, हा दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत होता.त्याच्या खिशात 52 हजाराची रक्कम होती.जी त्याला सांभाळता येत नव्हती.एका व्यक्तीने त्याला पाहिल्यानंतर पोलिसांना याविषयी माहिती दिली. याची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक अजित सिंह देवरे यांनी त्या मद्यपीला पोलीस स्टेशन येथे आणून आवश्यक ती कारवाई करून एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने याची संपूर्ण माहिती घेतली.त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला मात्र ते बाहेर गावी होते.सविस्तर माहिती मिळाल्यानंतर मुर्गेशनच्या पत्नीने ती रक्कम आम्ही येईपर्यंत आपल्याकडे सुरक्षित ठेवण्याची विनंती ठाणेदाराकडे केली.22 एप्रिल शनिवार रोजी मुर्गेशनच्या पत्नीने ठाणेदाराची भेट घेतली असता ठाणेदारांनी 52 हजारांची रक्कम त्यांच्या स्वाधीन केली.दारूच्या नशेत इतकी मोठी रक्कमेचे काही कमीजास्त झाले असते तर या महागाईच्या काळात परवडले नसते.परंतू संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे मिळाल्याने सफाई कामगाराच्या पत्नीने ठाणेदाराचे आभार मानले असून ठाणेदाराच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. 
Commendable performance by Thanedar...
                           --------//-------
                         
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
   मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या