Subscribe Us

header ads

भारतीय संविधान' उद्देशिका या भाषेत. Preamble to the Constitution of India in this language.

News@Korpanalive..
         गडचिरोलीतील नक्षल प्रभावित अतिदुर्गम भामरागड,एटापल्ली,अहेरी,धानोरा व छत्तीसगड, या सिमावर्ती भागात "आदिम माडिया समाज" Adim Madiya Society आहे.त्यांची स्वतंत्र बोलीभाषा,संस्कृती आहे.देशभरातील 75 व राज्यातील एकूण 3 आदिम समुदायांपैकी जल, जंगल,जमीनीवर उपजिविका करणारा हा एक समुदाय,मुलभूत गरजांचीच स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी 75 नंतरही पुर्तता न होवू शकणाऱ्या या भागात ''भारतीय संविधान''Constitution of India खरोखरच पोहोचले आहे काय.? मागील वर्षी "पाथ" संस्थेने एक सर्वेक्षण केले होते,त्यात 95% लोकांनी "संविधान'' हा शब्दच ऐकलाच नाही ! हे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहेत.त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे स्थानिक आदिम माडिया भाषेत माडिया समाजातील पहिले वकिल ॲड.लालसू नोगोटी, सामाजिक कार्यकर्ता चिन्ना महाका व अविनाश पोईनकर या तिघांनी भाषांतर/अनुवाद Translation केलेला आहे.संविधान तळागाळात-घराघरात पोहोचवणं आपली नैतिक जबाबदारी असल्याचे मत कवी अविनाश पोईनकरने यांनी व्यक्त केले आहे.
The Preamble of the Constitution in "Adim Madiya" language...
                          -------//-------
                   
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
  मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या